Rohit Sharma Record: मैदानात उतरताच हिटमॅनच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद! सचिन अन् सेहवागसारख्या दिग्गजांच्या यादीत केला प्रवेश

IND vs PAK, Asia Cup 2023: रोहितच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
virat kohli with rohit sharma
virat kohli with rohit sharmasaam tv

Rohit Sharma Record In Ind vs Pak Match:

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर ४ चा सामना कोलंबोच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. दरम्यान डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या कर्णधार रोहित शर्माच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे.

virat kohli with rohit sharma
IND vs PAK, Playing XI : बुमराहच्या कमबॅकनंतर टीम इंडियात होणार २ मोठे बदल; पाकला आव्हान देण्यासाठी अशी असेल प्लेइंग ११

रोहित शर्मा सलामीवीर फलंदाज म्हणून आपला ३०० वा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. यासह त्याने वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे.

पाकिस्तानविरूद्ध पार पडलेला सामना हा त्याचा ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. २२७ सामन्यांमध्ये तो सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानावर उतरला आहे. तर ७२ सामन्यांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे.

प्रथम फलंदाजी करताना त्याने ९८७० धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ३४९६ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

virat kohli with rohit sharma
World Cup 2023: बड्या बड्या बाता...ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणतो भारत नव्हे तर 'हे' संघ २ जाणार वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

सचिनच्या नावे आहे रेकॉर्ड..

भारतीय संघासाठी सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने ३४६ सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी डावाची सुरूवात केली आहे.

तर वीरेंद्र सेहवागने सलामीवीर फलंदाज म्हणून ३२१ सामने खेळले आहेत. रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर २६८ सामने खेळणारा शिखर धवन या यादीत चौथ्या स्थानी आहे.

रोहित- गिलची भागीदारी ..

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या जोडीने चांगली सुरूवात करून दिली होती. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी दोघांनी १२१ धावा जोडल्या.

या दरम्यान रोहित शर्माने ४९ चेंडूंचा सामना करत ५६ धावांची खेळी केली. तर शुबमन गिलने ५२ चेंडूंचा सामना करत ५८ धावांची खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com