Road Accident: रस्ते अपघात ठरला शाप! 'या' पाच दिग्गज क्रिकेटपटूंनी भीषण अपघातात गमावला होता जीव

भारताचा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंतच्या भीषण अपघाताच्या वृत्ताने क्रिडाविश्वात एकचं खळबळ उडाली आहे. या अपघातात रिषभ पंतवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची भीषणता इतकी होती की अपघातानंतर गाडीने पेट घेतला.
Rishikesh Car Accident
Rishikesh Car Accident saam tv
Published On

Rishabh Pant Accident: भारताचा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंतच्या भीषण अपघाताच्या वृत्ताने क्रिडाविश्वात एकचं खळबळ उडाली आहे. या अपघातात रिषभ पंतवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची भीषणता इतकी होती की अपघातानंतर गाडीने पेट घेतला. अपघाताच्या बातमीनंतर त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. (Rishabh Pant)

रस्ते अपघातात यााआधीही अनेक क्रिकेटपटूंना आपला जीव गमवावा लागला आहे. या क्रिकेटपटूंच्या अपघाताच्या बातम्यांनी संपूर्ण क्रिडा विश्व शोकसागरात बुडाले होते. पाहूया अशाच रस्ते अपघातात जीव गमावलेल्या क्रिकेटपटूंच्या अपघाताची भीषण कहाणी..

Rishikesh Car Accident
Lonavala Crime News: लोणावळ्यातील अवैध मटका व्यवसाय पोलिसांनी लावला उधळून; तब्बल १७ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

ऍंड्यू सायमंड्स - ऑस्ट्रलियाचा धडाकेबाज फलंदाज सायमंड्सलाही मे महिन्यात रस्ते अपघातात जीव गमवावा लागला होता.  ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ भीषण अपघात झाला होता.

रुनाको मॉर्टन - याआधी मार्च २०१२ मध्ये वेस्टइंडिजचा स्टार क्रिकेटपटू रुनाको मॉर्टनचा वयाच्या ३३ व्या वर्षी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. सेट्रल त्रिनिनादमधील चेस गावात त्याची गाडी महामार्गावरील खांबावर आदळली होती ज्यामुळे त्याला जीव गमवावा लागला.

बेन होलिओक- इंग्लडचा क्रिकेटपटू बेन होलिओकचाही असाच भीषण अपघातात मृत्यू झाला होता. मार्च २०२२ मध्ये गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी भिंतीवर आदळली होती. या अपघातात बेनचे जागीच निधन झाले होते. तर गाडीत त्याच्यासोबत असणारी त्याची गर्लफ्रेंड या अपघातातून सुदैवाने बचावली होती.

Rishikesh Car Accident
Rishabh Pant Accident : क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

मंजूरुल इस्लाम राणा- १६ मार्च २००७ रोजी वयाच्या २२ व्या वर्षी या बांग्लादेशी क्रिकेटपटूचे निधन झाले होते. त्यावेळी बांग्लादेशची टीम विश्वचषकासाठी वेस्टइंडिजमध्ये असताना हा अपघात घडला होता. मंजूरुलची गाडी एका बसला धडकल्याने हा अपघात घडला होता.

एज्रा मोसले- वेस्टइंडिजचा माजी क्रिकेटपटू एज्रा मोसलेचा फेब्रूवारी २०२१ मध्ये भीषण अपघातात मृत्यू झाला होता. बारबाडोसमधील एबीसी हायवेवर सायकल चालवत असताना त्यांना एका कारने धडक दिली होती, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. (West Indies)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com