RCB Vs UPW WPL 2023: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकली नाणेफेक, फलंदाजीचा निर्णय, पहा प्लेइंग इलेव्हन

RCB Vs UPW: नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होत आहे.
RCB vs UPW WPL 2023
RCB vs UPW WPL 2023Twitter

RCB vs UPW WPL 2023 : महिला प्रीमियर लीगच्या आठव्या सामन्यात शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना यूपी वॉरियर्सविरुद्ध होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होत आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली बंगळुरूसमोर एलिसा हिलीचे यूपी वॉरियर्सचे आव्हान आहे.

स्पर्धेत आरसीबीला आतापर्यंत एकही विजय नोंदवता आलेला नाही. बंगळुरू संघाने सलग तीन सामने गमावले असून या सामन्यात यूपी वॉरियर्सला मात देत पहिला विजय नोंदवण्याचा स्मृती मंधनाच्या संघाचा प्रयत्न असेल. दुसरीकडे यूपी वॉरियर्स एक विजय आणि एका पराभवासह दोन सामन्यांत दोन गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

RCB vs UPW WPL 2023
Manish Sisodia News: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया अडचणीत! १७ मार्चपर्यंत इडी कोठडीत रवानगी

पिच रिपोर्ट : खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळू शकते. त्यामुळे या सामन्यात फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग साइड बाऊंड्री छोटी आहे. फलंदाजांनी सरळ बॅटने खेळणे योग्य ठरेल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्लेइंग इलेव्हन : स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, अलिसा पेरी, हीथर नाइट, ऋचा घोष (विकेटकीपर), एरिन बर्न्स, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, सहाना पवार, कोमल जंजाद, रेणुका ठाकूर सिंह.

RCB vs UPW WPL 2023
Kirit Somaiya: अनिल परब आक्रमक! किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ? 'नाहक बदनामी झाल्याचे सांगत थेट...'

यूपी वॉरियर्स प्लेइंग इलेव्हन: अॅलिसा हिली (कर्णधार), श्वेता सहरावत, तालिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, सिमरन शेख, किरण नवगिरे, देविका वैद्य, सोफी एक्लेस्टन, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com