भारतीय क्रिकेट संघाचे (Team India) मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपुष्टात आला. आता त्यांनी खुलासा केला आहे की ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असताना सर्वात कठीण दिवस कोणता होता. भारताचे प्रशिक्षक असताना टीम इंडियाने बरेच काही साध्य केले आहे, पण मोठ्या आघाड्यांवरही संघ अपयशी ठरला आहे. 2019 च्या विश्वचषक उपांत्य फेरीत, 2021 च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2021) फायनलमध्ये आणि या वर्षीच्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने खराब कामगिरी केली. परंतु रवी शास्त्री म्हणाले ज्यावेळी भारतीय संघ 36 धावांवर ऑलआऊट झाला तो दिवस माझ्यासाठी सर्वात कठीण दिवस होता.
रवी शास्त्री यांनी 'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, "प्रशिक्षक म्हणून तुम्ही सतत फायरिंग लाइनमध्ये असता, त्याला दुसरा काही पर्याय नसतो. ही कामाची विडंबना आहे. तुम्हाला यासाठी पहिल्या दिवसापासूनच तयार राहावे लागते. मला माहित होते की आपण टीकेचे धनी होणार कारण यातून सुटका नाही. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही''. भारतीय संघ ज्यावेळी 36 (डिसेंबर 2020 मधील अॅडलेड डे/नाईट टेस्टमध्ये) धावसंख्येवर ऑल आउट झाला हा सर्वात वाईट क्षण होता. आमच्या हातात नऊ विकेट्स होत्या (दिवसाच्या सुरुवातीला) आणि नंतर आम्ही 36 धावांवर बाद झालो. फक्त 80 पेक्षा जास्त धावा करायच्या होत्या. पण तसे झाले नाही. आम्ही सगळे सुन्न झालो होतो. अनेक दिवस आम्ही धक्क्यात होतो की हे कसे झाले? असे शास्त्री मुलाखती दरम्यान म्हणाले.
ते पुढे म्हणाले, " हा माझ्यासाठी फक्त खराब दिवसच नव्हता तर मी हात वरती करुन म्हणालो यासाठी मी जबाबदर आहे हातात दगड घ्या. लपण्यासाठी कोणतीही जागा नाहिये. मी खेळाडूं एकच गोष्ट सांगितली होती की तुम्ही खेळावर लक्ष द्या. 36 वरती ऑल आऊट झाल्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर आम्ही सिरीज जिंकली. मला अजूनही विचार येतो की हे कसं झालं?. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत या मालिकेची आठवण येईल."
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.