Quinton De Kock Catch: डी कॉक बनला सुपरमॅन! भन्नाट कॅच पाहून तुम्हीही व्हाल फॅन - VIDEO

Quinton De Kock : क्विंटन डी कॉकने एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
quinton de kock
quinton de kocktwitter

SRH VS LSG IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज डबल हेडरचा थरार रंगणार आहे. पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडिअमवर सुरु आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यश ठाकूरच्या गोलंदाजीवर क्विंटन डी कॉकने एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

quinton de kock
Suryakumar Yadav Memes: 'तुमचा नादच लई डेंजर,आमचा सूर्या हो गेम चेंजर' तुफानी खेळीनंतर सोशल मीडियावर भन्नाट memes व्हायरल

क्विंटन डी कॉक आयपीएल २०२३ स्पर्धेत आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. मैदानातं उतरताच त्याने टिपलेल्या एका झेलची जोरदार चर्चा सुरु आहे. सहाव्या षटकात राहुल त्रिपाठीला बाद करण्यासाठी त्याने यष्टिरक्षण करताना अप्रतिम झेल टिपला आहे.

तर झाले असे की, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडून अनमोलप्रीत सिंग आणि अभिषेक शर्मा यांची जोडी मैदानात आली होती. अभिषेक शर्मा ७ धावांवर बाद होताच, राहुल त्रिपाठी फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो २० धावा करत माघारी परतला. (Latest sports updates)

quinton de kock
Rashid Khan Record: सूर्याचं शतक Rashid ने फिकं पाडलं! दिग्गजांना मागे सोडत IPL स्पर्धेत रचला इतिहास

तर झाले असे की, गुजरात टायटन्स संघाकडून सहावे षटक टाकण्यासाठी यश ठाकूर गोलंदाजीला आला होता. त्यावेळी चौथा चेंडू त्याने स्लोवर बाउन्सर टाकला. ज्यावर राहुल त्रिपाठीने थर्ड मॅनच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

परंतु हा प्रयत्न फसला. कारण चेंडू बॅटचा कडा घेत यष्टिरक्षण करत असलेल्या क्विंटन डी कॉकने उडी मारत भन्नाट झेल टिपला. हा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

सनरायझर्स हैदराबाद:

अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), एडन मार्करम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी

लखनऊ सुपर जायंट्स:

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), काइल मेयर्स, कृणाल पंड्या (कर्णधार ), प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com