PSL 2022: 'मधले बोट' दाखवणाऱ्या खेळाडूंना पाकिस्तान बोर्डाने दिली सजा

मंगळवारी पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात झालेल्या सामन्यात बेन कटींग आणि सोहेल तन्वीर यांच्यात पुन्हा भीडत पाहायला मिळाली.
PSL 2022
PSL 2022Saam TV
Published On

पीएसएल सामन्यादरम्यान सोहेल तन्वीर आणि बेन कटिंगची (Ben Cutting vs Sohail Tanvir) भीडत सर्वांनी पाहिली होती. ही चकमक 3 वर्षे जुनी आहे, जी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यादरम्यान बेन कटिंगने सोहेल तन्वीरला मधले बोट दाखवले होते. यानंतर, जेव्हा सोहेल तन्वीरने बदला म्हणून त्याला बाद केले आणि आपले मधले बोट दाखवले. आता पीसीबीने पाऊलं उचलंत दोघांनाही शिक्षा सुनावली आहे.

मंगळवारी पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात झालेल्या सामन्यात बेन कटींग आणि सोहेल तन्वीर यांच्यात पुन्हा भीडत पाहायला मिळाली. सोहेलच्या लगातार तीन चेंडूंवरती षटकार ठोकल्यानंतर बेन कटींगने त्याला मधले बोट दाखवले. मग पुन्हा बदला घेण्यासाठी सोहेल तन्वीरने बेन कटींगचा झेल पकडला आणि मधले बोट दाखवले. २०१८ साली झालेल्या सीपीएलच्या सामन्यात बेन कटींगला तन्वीरने मधले बोट दाखवले होते.

सामान्यादरम्यान असे वर्तवणुक केल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोघांनाही सजा दिली आहे. सामना फिसच्या १५ टक्के रक्कम बोर्डाने कापली आहे. पीसीबीने प्रेस नोट काढत याबाबतची माहिती दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com