हंगेरी (Hungary) येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चँपियनशिपमध्ये (World Cadet Championship) भारताने मोठे यश संपादन केले आहे. भारताची महिला खेळाडू प्रिया मलिक हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूचा 5-0 असा पराभव करून जागतिक कॅडेट कुस्ती (Wrestling) स्पर्धेत सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे. (Priya Malik wins gold at World Cadet Championship)
प्रियाने 2019 मध्ये पुण्यात खेलो इंडियामध्ये सुवर्ण पदक, 2019 मध्ये दिल्लीत 17 व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्ण पदक आणि 2020 मध्ये पटना येथे राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. प्रिया मलिकने सन 2020 मध्ये आयोजित राष्ट्रीय स्कूल गेम्समध्येही सुवर्ण जिंकले आहे.
मीराबाई चानूने शनिवारीच टोकियो ऑलिम्पिक -2020 मध्ये देशासाठी रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. त्यानंतर प्रिया मलिकनेही आपली कामगिरी दाखवत देशाची मान वाढवला आहे. प्रियाच्या या यशाबद्दल ट्विटरवरून लोक तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत प्रिया चौधरी ही भरतसिंग मेमोरियल स्पोर्ट्स स्कूल निडानीची खेळाडू आहे.
संदीप सिंग यांनी अभिनंदन केले
प्रियाच्या या कामगिरीबद्दल हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांनी प्रियाचे अभिनंदन केले आहे. "हंगेरीच्या बुडापेस्ट येथे आयोजित जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत हरियाणाची महिला कुस्तीपटू प्रिया मलिकचे अभिनंदन." अशा शब्दांत त्यांनी प्रियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रशिक्षक अंशु यांनी प्रियाला दिली साथ
प्रिया मलिकच्या यशामध्ये तिचे प्रशिक्षक अंशु मलिक यांनी मोठी भूमिका आहे. प्रियाने सन 2020 मध्ये झालेल्या नॅशनल स्कूल गेम्समध्ये सुवर्ण जिंकले. याशिवाय गेल्या वर्षी पाटण्यात झालेल्या राष्ट्रीय कॅडेट कुस्ती स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते. एके दिवशी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न आहे.
तनुलाही यश मिळालं
दरम्यान, भारताचा आणखी एक युवा कुस्तीपटू तनुनेदेखील विजय मिळवला आहे. तनूने तिच्या सामन्यात एकही गुण न गमावता 43 किलो वजन गटात जेतेपद जिंकले. तिने अंतिम सामन्यात बेलारूसच्या वलेरिया मिकीसीचचा पराभव केला. तर वर्षाने 65 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे.
Edited By- Anuradha
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.