Prithvi Shaw Net Worth: अलिशान घर,लाखोंची कार; 23 वर्षीय पृथ्वी शॉची संपत्ती पाहून अवाक व्हाल

Prithvi Shaw Car Collection: जाणून घ्या किती आहे पृथ्वी शॉची एकुण संपत्ती
prithvi shaw net worth
prithvi shaw net worth saam tv
Published On

Prithvi Shaw:

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ हा सध्या जोरदार चर्चेत आहे. भारतीय संघातून बाहेर असलेला पृथ्वी शॉ सध्या कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. तो इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये नॉर्थम्पटनशायर संघाचे प्रतिनिधित्व करतोय.

नुकताच त्याने या संघासाठी खेळताना दुहेरी शतक झळकावले आहे. त्याने या सामन्यात २४४ धावांची तुफानी खेळी करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.

prithvi shaw net worth
Team India News: एशिया कप २१ तर वर्ल्डकप ५७ दिवसांवर, टीम इंडियाला केव्हा मिळणार परफेक्ट प्लेइंग ११; काय आहेत आव्हानं? वाचा सविस्तर

पृथ्वी शॉला लक्झरी लाइफ जगायला आवडतं, त्याच्याकडे महागड्या कार देखील आहेत. दरम्यान आपण पृथ्वी शॉची कमाई, घर, कार आणि एकूण संपत्ती याविषयी सर्व काही जाणून घेणार आहोत.

माध्यमातील वृत्तानुसार पृथ्वी शॉची एकुण संपत्ती २५ कोटी रूपये इतकी आहे.तसेच तो वर्षाला एकुण ७.५ कोटी रूपयांची कमाई करतो. यासह पृथ्वी शॉचे विरारमध्ये अलिशान घर देखील आहे.

विरारमध्ये अलिशान घर..

महाराष्ट्रातील विरारमध्ये पृथ्वी शॉचे अलिशान घर आहे. यासह देशभरात त्याने प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. आपल्या अलिशान घराचे फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अलिशान घरासह त्याच्याकडे महागड्या गाड्या देखील आहेत. ज्यात BMW 6 Series आणि SUV कारचा समावेश आहे.

अशी आहे कारकिर्द..

पृथ्वी शॉला आतापर्यंत भारतीय संघासाठी ५ कसोटी, ६ वनडे आणि १ टी-२० सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १ अर्धशतक आणि १ शतकी खेळीच्या बळावर ३३९ धावा केल्या आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये त्याने १८९ धावा केल्या आहेत. तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याला खातेही उघडता आलेलं नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने पदार्पणाच्या सामन्यात वेस्टइंडीजविरूद्ध झालेल्या सामन्यात शतकी खेळी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com