Hasan Ali Celebration: नाद केला पण वाया गेला; जनरेटर सेलिब्रेशन करताना हसन अली पुन्हा एकदा दुखापतग्रस्त- Video

Hasan Ali Injured While Celebration: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करताना दुखापतग्रस्त झाला आहे.
Hasan Ali Celebration: नाद केला पण वाया गेला; जनरेटर सेलिब्रेशन करताना हसन अली पुन्हा एकदा दुखापतग्रस्त- Video
hasan ali twitter

फलंदाजाला बाद केल्यानंतर गोलंदाज जोरदार जल्लोष साजरा करत असतात. काही गोलंदाज फलंदाजाला बाद केल्यानंतर थेट मैदानाची प्रदक्षिणा घालतात. तर काही गोलंदाज फलंदाजाकडे रागात पाहून सेलिब्रेशन करतात. मात्र फलंदाजाला बाद केल्यानंतर दुखापतग्रस्त होणारा हसन अली हा पहिलाच गोलंदाज असावा. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली हा पुन्हा एकदा सेलिब्रेशन करताना दुखापतग्रस्त झाला आहे.

हसन अलीला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी पाकिस्तान संघात स्थान देण्यात आलेलं नाही. तो सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेली टी-२० ब्लास्ट स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. या स्पर्धत तो वारविकशायर संघाकडून खेळतोय. या स्पर्धेत वारविकशायर विरुद्ध नॉटिंघमशायर या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान हसन अली त्याचं फेवरेट जनरेटर सेलिब्रेशन करताना दुखापतग्रस्त झाला आहे.

Hasan Ali Celebration: नाद केला पण वाया गेला; जनरेटर सेलिब्रेशन करताना हसन अली पुन्हा एकदा दुखापतग्रस्त- Video
IND vs PAK: भारत- पाक सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आलं मोठं कारण

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हसन अली भन्नाट वेगाने यॉर्कर चेंडू टाकून फलंदाजाला क्लीन बोल्ड करतो. त्यानंतर तो अस्वस्थ असल्याचं दिसून आलं. फलंदाजाला बाद केल्यानंतर दुखापतग्रस्त होण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही सेलिब्रेशन करताना तो दुखापतग्रस्त झाला होता.

Hasan Ali Celebration: नाद केला पण वाया गेला; जनरेटर सेलिब्रेशन करताना हसन अली पुन्हा एकदा दुखापतग्रस्त- Video
IND vs PAK: 'भीती तर वाटणारच ना..', भारत- पाकिस्तान सामन्याआधीच बाबर आझम टेन्शनमध्ये

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात वारविकशायरने शानदार कामगिरी करत २२ धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना वारविकशायरने १९.३ षटकात १४९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नॉटिंघमशायरचा डाव १२७ धावांवर आटोपला.

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे पाकिस्तानचा संघ:

बाबर आजम (कप्तान), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम,मोहम्मद रिजवान, मुहम्मद इरफान खान, नसीम शाह, सईम अयूब, सलमान अली आगा , शादाब खान, शाहीन शाह अफरीदी, उस्मान खान, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com