Pakistan Cricket Team: पाकिस्तानी खेळाडूंकडून न्यूयॉर्कमध्ये वसूली! खेळाडूंना भेटण्यासाठी ठेवलं २ हजार रुपये तिकीट

Pakistan Cricket Team, T-20 World Cup 2024: पाकिस्तानचा संघ सध्या न्यूयॉर्कमध्ये असून एक मोठी बातमी समोर येत आहे.
Pakistan Cricket Team: पाकिस्तानी खेळाडूंकडून न्यूयॉर्कमध्ये वसूली! खेळाडूंना भेटण्यासाठी ठेवलं २ हजार रुपये तिकीट
pakistan cricket team twitter

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना खेळण्यापूर्वीच पाकिस्तानचा संघ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी वाद हा क्रिकेटच्या मैदानावर नाही, तर क्रिकेटच्या मैदानाबाहेर घडला आहे. पाकिस्तानचा संघ सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. माध्यमातील वृत्तानुसार, पाकिस्तान संघ किंवा मॅनेजमेंटने न्यूयॉर्कच्या एका हॉटेलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या मीट अँड ग्रीड कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खेळाडूंची भेट घेण्यासाठी त्यांनी प्रवेश शुल्क म्हणून २५ डॉलर इतकी रक्कम ठेवली होती.

ही बातमी बाहेर येताच पाकिस्तानचे माजी कर्णधार रशीद लतीफ नाराज झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनी एका टीव्ही शोमध्ये टीम मॅनेजमेंटचा जोरदार टोला लगावला आहे. कमरान मुजफ्फर या कार्यक्रमाचा होस्ट होता. नियाजने देखील या कार्यक्रमावरुन नाराजी व्यक्त केली आहे. त्याने पाकिस्तानच्या खेळाडूंना अशा कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्यावरुन फटकारलं आहे.

रशीद लतीफ म्हणाले की,' अधिकृतरित्या डिनर पार्टी होते. मात्र ही प्रायव्हेट डिनर पार्टी आहे. असं कोण करु शकतं? याचा अर्थ असाच झाला, की २५ डॉलर्समध्ये तुम्ही आमच्या खेळाडूंची भेट घेतली. जर काही चुकीचं झालं, असतं तर लोकं हेच म्हणाले असते की पैसे कमवताय.'

Pakistan Cricket Team: पाकिस्तानी खेळाडूंकडून न्यूयॉर्कमध्ये वसूली! खेळाडूंना भेटण्यासाठी ठेवलं २ हजार रुपये तिकीट
IND vs PAK: भारत- पाक सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आलं मोठं कारण

तसेच ते पुढे म्हणाले की,' लोकांनी मला सांगितलं की, जेव्हा कोणी पाकिस्तानी खेळाडूंना आमंत्रण देतं त्यावेळी ते किती पैसा देणार? हेच विचारतात. हे कॉमन आहे. आमच्यावेळी गोष्टी वेगळ्या होत्या. आमच्यावेळी २-३ डिनर असायचे, मात्र ते ऑफिशियल नसायचे. मात्र हे हायलाईट केलं गेलं कारण वर्ल्डकप सुरु आहे. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंनी सावध राहायला हवं.'

Pakistan Cricket Team: पाकिस्तानी खेळाडूंकडून न्यूयॉर्कमध्ये वसूली! खेळाडूंना भेटण्यासाठी ठेवलं २ हजार रुपये तिकीट
IND vs IRE, Pitch Report: टीम इंडियासमोर आयर्लंडचं आव्हान! खेळपट्टी कोणाला देणार साथ?

तसेच ते पुढे म्हणाले की, ' तुम्ही २-३ डिनरला जाऊ शकता. तुम्ही चॅरिटी आणि फंड रेजिंग गोळा करण्यासाठीही जाऊ शकता. मात्र हे फंड रेजिंगही नव्हतं आणि चॅरिटी डिनरही नव्हता. हा केवळ पाकिस्तान संघाच्या नावाने चालवण्यात आलेला प्रायव्हेट डिनर होता.' पाकिस्तानचा पहिला सामना अमेरिकेसोबत होणार आहे. तर ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com