कराची: पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) राष्ट्रीय स्तरावरील एका प्रशिक्षकावर मोठी कारवाई केली आहे. महिला क्रिकेटपटूचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी त्याला निलंबित करण्यात आलं आहे.
महिला क्रिकेटपटूनं मुल्तान क्षेत्राचे प्रशिक्षक नदीम इकबाल याच्यावर छेडछाडीचे आरोप केले आहेत. नदीम हे त्यांच्या काळातील स्टार गोलंदाज होते. पाकिस्तानचा वेगवाग गोलंदाज वकार युनूस ज्या संघाकडून खेळत होता, त्या प्रथम श्रेणी क्रिकेट संघातून नदीम यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्यानं याबाबत सांगितलं की, महिला क्रिकेटपटूच्या विनयभंग प्रकरणाची चौकशी सुरू केलेली आहे. नदीम याने बोर्डाच्या नोकरीसंदर्भातील अटी आणि शर्तींचे उल्लंघन केले आहे का, याचा तपास केला जाणार आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस त्यांच्या स्तरावर करतीलच, आम्ही केवळ नदीमने बोर्डाच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केले की नाही, या आम्ही करत असलेल्या चौकशीतून समोर येईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
५० वर्षीय नदीम ८० प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. वकार युनूसपेक्षा चांगला गोलंदाज म्हणून नदीमची ख्याती होती. पीडित महिला क्रिकेटपटूने पोलिसांत तक्रार दिली असून, ती काही वर्षांपूर्वी मुल्तानमध्ये पीसीबी महिला खेळाडूंच्या चाचणीसाठी गेली होती. त्यावेळी नदीम तिथे प्रशिक्षक म्हणून होते, असे तिने म्हटले आहे. (Cricket Upadte News)
पीडितेने आरोप करताना एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. प्रशिक्षकांनी मला महिला संघात निवड करण्याचे आणि नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. या बहाण्याने ते माझ्या अधिक जवळ आले. प्रशिक्षकांनी माझे लैंगिक शोषण केले. त्यांच्या साथीदारांनीही शोषण केले. इतकेच नाही तर, त्यांनी आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केलं, असा आरोप तिने केला आहे.
यापूर्वी २०१४ मध्ये ५ महिला क्रिकेटपटूंनी मुल्तानच्या एका खासगी क्रिकेट क्लबच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले होते. त्यांनी लैंगिक शोषण केल्याचा त्यांचा आरोप होता. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या कसोटी संघातील फिरकीपटू यासिर शाह याच्यावरही एका तरुणीने गंभीर आरोप केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.