Joe Root : जो रुटच्या नावे मोठा विक्रम; सचिन किंचित मागे राहिला, तर विराट-रोहितसाठी तर अशक्यच

रुटच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ यांनी ही कामगिरी केली आहे.
Joe root
Joe root
Published On

ENGvsPAK Test Match: क्रिकेटमध्ये जेव्हा रेकॉर्ड्स बनतात त्यावेळी ते मोडण्यासाठी कोणीतरी सज्ज असतं. मात्र काही रेकॉर्ड्स असे असतात जे मोडणे शक्य असतं पण लवकर शक्य नसतं. सध्याच्या क्रिकेटबद्दल बोलायचं तर इंग्लंडचा खेळाडू जो रुटच्या (Joe Root) नावे टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड आहेत. विराट कोहलीसोबत त्याची नेहमी तुलना होते.

मात्र पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात जो रूटने असा विक्रम केला आहे, जो विराट कोहलीला मोडणे कठीणच नाही तर अशक्य आहे. रोहित शर्माला देखील हा रेकॉर्ड मोडणे शक्य होणार नाही.

Joe root
Happy Birthday Yuvraj: युवराजच्या ताफ्यात आहेत 'या' आलीशान गाड्या, किमती ऐकून चक्रावून जाल

जो रुटने नेमका कोणता विक्रम केला?

पाकिस्तान विरुद्धच्या मुल्तान टेस्टमध्ये दुसऱ्या डावात रुटने 10 धावा केल्या तर पाकिस्तानच्या फहीम अश्रफला बाद केले. या विकेटनंतर जो रूटच्या नावे कसोटी कारकिर्दीत 50 विकेट झाल्या. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा आणि 50 विकेट घेणारा तो इंग्लंडकडून पहिला आणि जगातील तिसरा खेळाडू बनला आहे.

त्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ यांनी ही कामगिरी केली आहे. रूटच्या नावावर कसोटीत 5 द्विशतकांसह 28 शतके आणि 55 अर्धशतकांसह 10629 धावा आहेत. (Sports News)

Joe root
FIFA World Cup 2022 Video: रोनाल्डोचं अधूरं स्वप्न; फ्री-किकचा बेताज बादशाह रोनाल्डो ढसाढसा रडला!

सचिन तेंडुलकर 4 पावलं दूर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे टेस्टमध्ये 46 विकेट्स आहेत, तर विश्वविक्रम 15921 धावांचा आहे. सचिनने आणखी 4 विकेट घेतल्या असत्या तर तोही या यादीत समाविष्ट झाला असता.

विराटची बॅट गेल्या काही महिन्यांपासून थंड होती. विराटच्या नावे सध्या 8074 धावा आहेत.तर एकही विकेट त्याला घेता आलेली नाही. तर रोहितच्या नावावर फक्त 2 विकेट आहेत आणि फक्त 3137 धावा आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com