PAK vs ENG: संघ बदलला,नशीब बदललं! इंग्लंडला लोळवत पाकिस्तानने रचला इतिहास
pakistan cricket teamtwitter

PAK vs ENG: संघ बदलला,नशीब बदललं! इंग्लंडला लोळवत पाकिस्तानने रचला इतिहास

Pakistan vs England 3rd Test: मालिकेतील पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर पाकिस्तानने दमदार कमबॅक केलं आहे.
Published on

England vs Pakistan 3rd Test: पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा तिसऱ्याच दिवशी धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ३६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने ९ गडी राखून विजय मिळवला आहे.

पाकिस्तानने गेल्या ३ वर्षात मायदेशात खेळताना एकही कसोटी मालिका जिंकली नव्हती. मालिकेतील पहिल्या कसोटीतही पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

पाकिस्तानने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात फलंदाजी कराताना ५०० हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र तरीही पाकिस्तानला १ डाव राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. यासह इंग्लंडने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती.

मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी पाकिस्तान संघात मोठे बदल करण्यात आले होते. निवडकर्त्यांनी बाबर आझमसह संघातील प्रमुख गोलंदाजांना बसवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे फॅन्सला आश्चर्याचा धक्का बसला. पण हा निर्णय योग्य ठरला. पाकिस्तानने पुढील दोन्ही सामन्यांमध्ये दमदार कमबॅक केलं आणि मालिका २-१ ने आपल्या नावावर केली.

PAK vs ENG: संघ बदलला,नशीब बदललं! इंग्लंडला लोळवत पाकिस्तानने रचला इतिहास
IND vs NZ 2nd Test, Day 3: न्यूझीलंडचं पॅकअप! भारतासमोर जिंकण्यासाठी डोंगराइतकं आव्हान

पाकिस्तानचा मालिका विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना २६७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानने ३४४ धावा करत आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडचा डाव अवघ्या ११२ धावांवर आटोपला. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी ३५ धावांची गरज होती. हे आव्हान पाकिस्तानने ९ गडी राखून पूर्ण केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com