2008 नंतर प्रथमच ऑलिम्पिकमध्ये 'जन गण मन'!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताच्या निरज चोप्राने (Neeraj Chopra) पदक जिंकून इतिहास रचला आहे.
2008 नंतर प्रथमच ऑलिम्पिकमध्ये 'जन गण मन'!
2008 नंतर प्रथमच ऑलिम्पिकमध्ये 'जन गण मन'! Twitter/ @Pvsindhu1
Published On

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताच्या निरज चोप्राने (Neeraj Chopra) पदक जिंकून इतिहास रचला आहे. 2008 नंतर प्रथमच भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकता आले आहे. 2008 मध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर सुवर्ण पदकासाठी भारताला संघर्ष करावा लागत होता. 2008 मध्ये भारताचे राष्ट्रगीत बिजींगमध्ये ऐकायला मिळाले होते. त्यानंतर आता वाजले आहे. या अगोदर 1980 हॅाकीमध्ये भारताचा विजय झाला होता. तेव्हा राष्ट्रगीत ऐकायला मिळाले होते.

भारताच्या सुवर्ण पदकाचा इतिहास

भारताच्या बाजूने विचार केला तर 121 वर्षापूर्वी भारताने प्रथम: ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. सन 1900 मध्ये भारताने प्रथमच (India in Olympics) ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. त्यावेळी पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये एका खेळाडूने देशाचे प्रतिनिधित्व केले. नॉर्मन प्रिचार्डने भारताला दोन पदके मिळवून दिले होते. तथापि, पहिल्यांदाच देशाला सन 1928 मध्ये सुवर्णपदक मिळाले होते. भारतीय हॉकी संघाने (Indian hockey in Olympics) हे सुवर्ण पदक जिंकले होते.

2008 नंतर प्रथमच ऑलिम्पिकमध्ये 'जन गण मन'!
Olympics 2020: पहिलं सुवर्ण! उगवत्या सूर्याच्या देशात चमकला भारताचा भूमिपुत्र

अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने नेदरलँड्सचा 3-0 असा पराभव करून देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्या सामन्यात हॉकीचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या मेजर ध्यानचंदने दोन गोल केले होते. सुमारे 23 हजार लोकांनी हा सामना पाहिला. यानंतर 1932 मध्ये देशाला दुसरे सुवर्णपदक मिळाले. भारतीय हॉकी संघाने दोन सामने लगातार जिंकून अमेरिकेच्या लान्स एंजलिसमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले. त्या स्पर्धेत संघाने एकूण 35 गोल केले होते. त्यावेळी समोरच्या संघाने केवळ दोन गोल केले होते. भारताने जपानला 11-1 असे पराभूत केले होते. या सामन्यात ध्यानचंदने चार गोल केले. त्यानंतर दुसर्‍या सामन्यात अमेरिकेला भारताने 24-1 ने पराभूत केले. त्या सामन्यात रूप सिंगने 10 तर ध्यानचंदने 8 गोल केले होते.

दरम्यान हॉकी सोडून इतर खेळांबद्दल बोलताना 1980 नंतर भारताला 2008 मध्ये पहिले सुवर्णपदक मिळाले. अभिनव बिंद्राने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. वैयक्तिक खेळात सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा एकमेव खेळाडू आहे. हॉकी व्यतिरिक्त इतर खेळात त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. स्वातंत्र्याला 74 वर्षे झाली असून देशात फक्त 5 सुवर्ण पदके होती. आता टोकियोमध्ये 6 व्या पदकाची भर पडली आहे.

4 वर्षापुर्वी केलं होतं भाकित

भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदका नेऊन इतिहास रचला खरा पण या इतिहास रचण्याची कथा नीरजने 4 वर्षांपूर्वी सुरू केली होती. ही गोष्ट त्याने स्वतः आपल्या ट्विटद्वारे सांगितली होती.

हरियाणा सरकारचे गिफ्ट

मुळचा हरियाणा मधील पानीपतचा असलेल्या निरजने पदक जिंकताच त्याच्या गावात जल्लोष पाहायला मिळाला. त्याचबरोबर निरजला हरियाणा सरकारने 6 कोटी रुपये आणि वर्ग 1 ची नोकरी जाहीर केली आहे. निरज सध्या भारतीय सैन्यामध्ये नायब सुभेदार पदावर कार्यरत आहे.

निरजने पदक जिंकून भारताचा सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपवला आहे. तब्बल 13 वर्षानंतर टोकियोत भारतीयांना जन गन मनं ऐकायला मिळालं आहे. 1980 नंतर 2008 मध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकल्यानंतर बिजींगमध्ये जन गन मनं ऐकायला मिळालं होतं.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com