Neeraj Chopra: नीरज चोप्राने रचला आणखी एक इतिहास; डायमंड लीग स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय

या स्पर्धेत त्याने 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत प्रथम स्थान पटकावलं.
Neeraj Chopra
Neeraj ChopraSaam Tv
Published On

Neeraj Chopra wins Lausanne Diamond League: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. नीरज चोप्राने (Neeraj Chopra) शुक्रवारी 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत ऐतिहासिक डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपद पटकावले. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नीरजने रौप्यपदक पटकावले होते. त्यावेळी त्याच्या कंबरेला दुखापत झाली होती.

ही कमाल कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. हंगेरीतील बुडापेस्ट येथे २०२३ च्या जागतिक स्पर्धेसाठीही तो पात्र ठरला आहे. यासोबतच हंगेरीतील बुडापेस्ट येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 साठीही नीरज पात्र ठरला आहे. त्याच्या कारकिर्दीतील हा तिसरा सर्वोत्तम प्रयत्न आहे.

हे देखील पाहा -

नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भाला फेकला. यानंतर नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 85.18 मीटर भाला फेकला. यानंतर त्याने तिसरा थ्रो केलाच नाही. त्यानंतर चोप्राचा चौथा प्रयत्न फाऊल घोषित झाला आणि नंतर त्याने पाचव्या प्रयत्न देखील केला नाही. पहिल्या थ्रोच्या बळावर नीरजला विजयी घोषित करण्यात आलं.

नीरज चोप्रा डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. तसेच डायमंड लीगच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नीरज चोप्रापूर्वी, डिस्कस थ्रोअर विकास गौडा हे डायमंड लीगच्या पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय होते.

Neeraj Chopra
Petrol Diesel Price: टाकी फुल्ल करण्याचा विचार करताय? मग आधी पेट्रोल-डिझेलचे दर तपासा

रौप्य पदक पटकावताना झाली होती दुखापत

नीरजने गेल्या महिन्यात जागतिक चॅम्पियनशिपमध्ये ८८.१३ मीटर भाला फेकत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले होते. त्या सामन्यादरम्यान नीरजच्या मांडीला दुखापत झाली होती. यानंतर नीरज चोप्राला वैद्यकीय पथकाने चार-पाच आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तो बर्मिंगहम येथे 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत तो खेळू शकला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com