Murali Vijay: काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा फलंदाज मुरली विजयने(Murali Vijay)आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. नुकताच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. जे जोरदार व्हायरल होत आहे.
जाणून घ्या काय आहे प्रकरण..
सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर -गावसकर ट्रॉफी सुरू आहे. तर ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे.
या सामन्यात भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर हे समालोचकाची भूमिका पार पडत आहेत. जेव्हा सामना सुरु होता, त्यावेळी स्क्रीन वर अर्धशतक झळकावल्यानंतर यशस्वीरीत्या शतक झळकावणाऱ्या फलंदाजांची यादी दाखवण्यात आली. (Latest Sports Updates)
या यादीत भारतीय संघाचा माजी फलंदाज मुरली विजय पहिल्या स्थानी आहे. हे पाहून लाईव्ह समालोचन करत असलेल्या संजय मांजरेकर यांनी म्हटले की, "या यादीत मी मुरली विजयचं नाव पाहून आश्चर्यचकित आहे."
संजय मांजरेकर यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर मुरली विजय संतापला आहे. त्याने संजय मांजरेकर आणि बीसीसीआयला टॅग करत लिहिले की, "मुंबईचे काही खेळाडू दाक्षिणात्य खेळाडूंचे कधीच कौतुक करत नाही."
मुरली विजयला गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळत नव्हती. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता.
वयाच्या ३८ व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या मुरली विजयने ६१ कसोटी सामन्यांमध्ये ३९८२, १७ वनडे सामन्यांमध्ये ३३९ आणि ९ टी-२० सामन्यांमध्ये १६९ धावा केल्या आहेत .
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.