IPL Auction 2023: झिंम्बाबेच्या 'या' धडाकेबाज खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स ओतणार पैसा? पाकिस्तानशी आहे खास कनेक्शन

त्याने पाकिस्तान एअरफोर्स पब्लिक स्कूल लोअर टोपा येथे तीन वर्षे शिक्षण घेतले असून त्याला पाकिस्तानी हवाई दलाचा पायलट होण्याची इच्छा होती.
sikandar raza
sikandar razasaamtv
Published On

IPL 2023: आयपीएल 2023 चा लिलाव 23 डिसेंबरला होणार आहे. कोच्चीमध्ये होणाऱ्या या लिलावाकडे सर्वच संघाचे लक्ष लागून राहिले आहे. लिलावामध्ये सर्वाधिक वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावावर करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात कोणते नवीन खेळाडू येणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

या लिलावाआधी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तब्बल 13 खेळाडूंना संघातून मुक्त केले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सपुढे त्यांचा संपूर्ण संघ नव्याने बांधण्याचे आव्हान असणार आहे. अशावेळी वेस्ट झिंम्बाबेचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझावर सर्वाधिक बोली लावण्याची शक्यता आहे.

sikandar raza
Chandrakant Patil: 'भीकं मागणं शब्द प्रबोधनकार ठाकरेंचाच' उद्धव ठाकरेंना चंद्रकात पाटलांनी थेट पुस्तकचं दाखवलं

कोण आहे सिकंदर रझा?

सिकंदर रझा हा पाकिस्तानी (Pakistan) वंशाचा झिम्बाब्वेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये जन्मलेल्या रझाने 2002 मध्ये कुटुंबासह झिम्बाब्वेला स्थलांतर केले. त्यानंतर तो लवकरच झिम्बाब्वे देशांतर्गत स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक बनला. त्यानंतर 2011 मध्ये त्याला झिम्बाब्वेचं नागरिकत्वही मिळालं.

रझा पंजाबी भाषिक काश्मिरी कुटुंबातून येतो. त्याने पाकिस्तान एअरफोर्स पब्लिक स्कूल लोअर टोपा येथे तीन वर्षे शिक्षण घेतले. त्याला पाकिस्तानी हवाई दलाचा पायलट होण्याची इच्छा होती. व्हीजन टेस्टमध्ये फेल झाल्याने त्याचं ते स्वप्न अपूरच राहिलं.

sikandar raza
Jalgaon News: पैशांसाठी काहीही..विवाहित असूनही अविवाहित असल्‍याचे दाखवत लावला विवाह

दरम्यान, सध्या मुंबई इंडियन्स संघाला सातव्या क्रमांकावर फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूची गरज आहे. त्याचदृष्टीने मुंबई इंडियन्स झिंम्बाबेच्या सिकंदर रजाला संघात घेण्यावर भर देईल. सिकंदर रजाकडे क्रिकेटचा मोठा अनुभव असून आपल्या धडाकेबाज खेळीसाठी तो ओळखला जातो. वेस्टइंडिजच्या काईरान पोलार्डने निवृत्ती घेतल्यानंतर मुंबईला त्याच्यासारख्याच धडाकेबाज, स्फोटक अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. त्यामुळेच मुंबईसाठी सिकंदर रजा सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com