Mohammed Shami:फलंदाजीमध्ये शमीचा मोठा विक्रम!सचिन, विराटसह अनेक दिग्गजांना सोडलंय मागे

फलंदाजीला येताच त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर आक्रमण करायला सुरुवात केली. त्याने ४७ चेंडूंचा सामना करत ३७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Mohammed Shami
Mohammed Shami Saam tv
Published On

Mohaamed Shami: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ४०० धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २२३ धावांची आघाडी घेतली आहे.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर मोहम्मद शमी फलंदाजीला आला. फलंदाजीला येताच त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर आक्रमण करायला सुरुवात केली.

त्याने ४७ चेंडूंचा सामना करत ३७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

कोहली,धवन आणि युवराजला सोडलं मागे..

शमीने पहिल्या डावात आक्रमक फलंदाजी करत ३७ धावांची खेळी केली. आपल्या या खेळी दरम्यान मोहम्मद शमीने २ गगनचुंबी षटकार मारले. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे सोडलं आहे. (Latest Sports news)

Mohammed Shami
IND VS AUS 1st Test :तिसऱ्या दिवशीही भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर भारी! पहिल्या डावात घेतली इतक्या धावांची आघाडी

विराटने १०५ कसोटी सामन्यांमध्ये २४ षटकार मारले आहेत. तर मोहम्मद शमीने अवघ्या ६१ सामन्यांमध्ये २५ षटकार मारले आहेत.

ठरला भारताचा १६ वा खेळाडू..

भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा वीरेंद्र सेहवागच्या नावे आहे. वीरेंद्र सेहवागने १०३ कसोटी सामन्यांमध्ये ९० षटकार मारले आहेत. तर या यादीत दुसऱ्या स्थानी एमएस धोनी आहे.

Mohammed Shami
IND VS AUS 1st Test : शतक झळकावताच रोहितला मिळाली वाईट बातमी!उर्वरित सामन्यांमध्ये चिंता वाढण्याची शक्यता

धोनीने ७८ षटकार मारले आहेत. तर ६९ षटकारांसह सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानी आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा या यादीत चौथ्या स्थानी आहे. रोहित शर्माने ६६ षटकार मारले आहेत. तर २५ षटकारांसह मोहम्मद शमी हा १६ व्या स्थानी पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com