Mohammed Shami VIDEO: शमीच्या सुस्साट बॉलवर दांडी गूल! बॅट्समन बघतच राहिला

मोहम्मद शमीने मार्नस लाबुशेनला बाद केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Mohammed Shami Balling
Mohammed Shami BallingTwitter

Ind vs Aus Mohammed Shami: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यासाठी रोहित शर्माने प्लेइंग ११ मध्ये एक बदल केला आहे.

मोहम्मद सिराजला संघाबाहेर करून मोहम्मद शमीला संधी देण्यात आली आहे. सुरुवातीला या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला होता.

मात्र त्यानंतर आर अश्विन आणि मोहम्मद शमीने भारतीय संघाला जोरदार पुनरागमन करून दिले. दरम्यान त्याने मार्नस लाबुशेनला बाद केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

Mohammed Shami Balling
IND VS AUS 4th Test: चौथा कसोटी सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील पंतप्रधानांची उपस्थिती; नरेंद्र मोदी कॉमेंट्री करण्याची शक्यता

या सामन्यातील पहिल्या डावात २३ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी गोलंदाजीला आला होता. या षटकात त्याने असा काही चेंडू टाकला जो मार्नस लाबुशेनला काही कळलाच नाही.

या षटकातील दुसरा चेंडू मोहम्मद शमीने भन्नाट गतीने ऑफ साईडच्या बाहेर टाकला होता. या चेंडूवर मार्नस लाबुशेनने ऑफ साईडच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला फसला. कारण चेंडू बॅटची कडा घेत यष्टीला जाऊन धडकला.

Mohammed Shami Balling
IND VS AUS 4th test: चौथा कसोटी सामना जिंकून टीम इंडिया इतिहास रचणार! जगातील कुठल्याच संघाला न जमलेला पराक्रम करण्याची संधी

या सामन्यात स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघाला सलामीवीर फलंदाजानी चांगली सुरुवात करून दिली होती. ट्रेवीस हेड आणि उस्मान ख्वाजा यांनी मिळून ६१ धावांची भागीदारी केली.

तर ७२ धावांवर ऑस्ट्रेलिया संघाला दुसरा धक्का बसला. मार्नस लाबुशेन अवघ्या ३ धावा करत माघारी परतला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत :

रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल,चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया :

उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पिटर हँड्सकाँब, कॅमरन ग्रीन, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुन्हेमन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com