मावळमध्ये कुस्त्यांचे फड रंगणार; पैलवानांची कुस्तीची जोरदार तयारी सुरु...

पट्टीचे जोर मारणे, बैठका, सरपाट्या, धावणे, पोहणे अशा कसरती करत पैलवान मंडळी बलदंड शरीर कमविण्यासाठी कष्ट घेत आहेत.
मावळमध्ये कुस्त्यांचे फड रंगणार; पैलवानांची कुस्तीची जोरदार तयारी सुरु...
मावळमध्ये कुस्त्यांचे फड रंगणार; पैलवानांची कुस्तीची जोरदार तयारी सुरु...दिलीप कांबळे

मावळ: दिवाळी झाली की सर्वच ग्रामीण भागात वेध लागतात ते जत्रेचे आणि यात्रेचे. कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून यात्रा-जत्रा बंद होत्या. त्यामुळे कुस्त्याचे फड देखील बंद होती. मात्र आता कोरोनाच संकट काहीसं कमी झालेल पाहायला मिळत असल्याने यावर्षी गावागावात यात्रा-जत्रा भरणार असल्याची चिन्ह आहेत. यात्रा-जत्रा भरणार म्हटल्यावर त्यात कुस्त्यांचे फड देखील रंगणार आहेत, त्यामुळेच आता मावळ तालुक्यातील पैलवानांची यात्रेतील कुस्तीसाठी जोरदार तयारी करत असल्याचे चित्र दिसत आहे. (Maval will fill the wrestling grounds; Wrestlers start preparing for wrestling)

हे देखील पहा -

पट्टीचे जोर मारणे, बैठका, सरपाट्या, धावणे, पोहणे, अशा कसरती करत पैलवान मंडळी बलदंड शरीर कमविण्यासाठी कष्ट घेत आहेत. मावळ तालुका हा ग्रामीण आणि शहरी असा दोन्ही भाग असल्यामुळे याठिकाणी गावागावांत व्यायामशाळा आणि जिम आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागात व्यायामशाळांमध्ये आता सकाळी-सकाळी पैलवानांची कसरती करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. मावळमधील कुस्तीसाठी वातावरणही पोषक आहे आणि सकाळी गुलाबी थंडीत मल्ल आपले शंदू ठोकताना दिसत आहे. कुस्त्या ह्या दोन प्रकारे खेळल्या जातात, एक मॅट वरील कुस्ती आणि दुसरी माती वरील कुस्ती. या दोन्ही पद्धतीने कुस्ती खेळायला मल्ल तयारी करीत आहे.

येणाऱ्या यात्रांसाठी हे पैलवान तयारी करत असले तरी प्रत्येक पैलवानाला महिन्याकाठी किमान पंधरा ते वीस हजार रुपये खर्च होत असतो. अनेक पैलवान हे गरीब घरातून आलेले असल्यामुळे त्यांना खुराकाचा खर्च हा परवडत नाही. यात्रांमध्ये होणाऱ्या कुस्त्यांच्या पैशातूनच खुरागीचा खर्च ते करीत असतात. मागील दोन वर्षांपासून कुस्त्या आणि यात्रा बंद असल्याने अनेक पैलवानांची गैरसोय झाली. शासनाने आमच्याकडेपण लक्ष देऊन आम्हाला देखील काहीतरी मदत करावी अशी मागणी पैलवानांनी यानिमित्ताने केली.

मातीमधील कुस्ती ही पारंपारिक पद्धतीने खेळली जाते, तर मॅटवरील कुस्ती ही आंतरराष्ट्रीय पद्धतीने खेळली जाते. मात्र देशाची मान उंचावयाची असेल तर राज्य सरकारने ग्रामीण भागातील कुस्ती मल्लाकडे लक्ष देण्याची गरज आहे. अतिशय बिकट परिस्थितीनं ग्रामीण भागातील मल्ल हा पारंपरिक कुस्ती जोपासण्याचा प्रयत्न करीत असताना दिसत आहे.

मावळमध्ये कुस्त्यांचे फड रंगणार; पैलवानांची कुस्तीची जोरदार तयारी सुरु...
SBI आणि MGB बँकेच्या घोळात गावकऱ्यांना अनुदान नाहीच; सरपंचाचा आंदोलनाचा इशारा

येणाऱ्या काळात यात्रा भरणार असल्याने सर्वच मल्ल सध्या जीवाची बाजी लावून उत्कृष्ट पैलवान म्हणून तयार होण्याचा प्रयत्न करत आहेत. थंडीचे चार महिने हे मल्ल जीवाचे रान करून तयारी करत असतात, त्यांच्यासाठी हे चार महिने आणि येणाऱ्या यात्रा महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com