Marcus Stoinis DRS: एका DRS ने केला मुंबईचा 'गेम' पाहा १७ व्या षटकात नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ - VIDEO

Marcus Stoinis LBW: एक डीआरएस लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी गेम चेंजिंग ठरला आहे.
LSG VS MI
LSG VS MI SAAM TV

LSG VS MI, IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. सर्व संघाचं लक्ष केवळ आणि केवळ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यावर असणार आहे. मुंबई इंडियन्स संघासाठी मंगळवारी झालेला सामना अतिशय महत्वाचा होता.

या महत्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला ५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून मार्कस स्टोइनिसने तुफानी खेळी करत मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये जाण्यापासून रोखलं आहे. दरम्यान एक डीआरएस लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी गेम चेंजिंग ठरला आहे.

LSG VS MI
IPL 2023, MI vs LSG: रोहित शर्माची एक चूक अन् स्टॉयनिसने साधली संधी; लखनौचे मुंबईला १७८ धावांचे आव्हान

तर झाले असे की, या सामन्यात मुंबईची गोलंदाजी सुरु असताना १७ वे षटक टाकण्यासाठी आकाश मधवाल गोलंदाजीला आला होता. या षटकात त्याने फलंदाजी करत असलेल्या मार्कस स्टोइनिसला भन्नाट यॉर्कर चेंडू टाकला.

जो थेट मार्कस स्टोइनिसच्या पॅडला जाऊन धडकला. अंपायरकडे मागणी केली असता त्याला अंपायरने बाद घोषित केले. स्टोइनिसने क्षणही न दवडता डीआरएसची मागणी केली. त्याला वाटत होतं की, तो बाद आहे. त्यामळे त्याने पॅव्हेलियनच्या दिशेने जायला सुरूवात केली होती. (Latest sports updates)

LSG VS MI
IPL 2023 Purple Cap List: राशिदच्या हातून Purple Cap निसटली, 'या' डॅशिंग भारतीय खेळाडूने केला कब्जा

अंपायरने डीआरएसमध्ये पाहिलं तेव्हा चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नव्हता. मात्र ज्यावेळी बॉल ट्रॅकिंगचा वापर केला गेला त्यावेळी दिसून आले की, चेंडू लेग स्टंपपासून दूर जातोय.

त्यामुळे अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला. त्यानंतर मार्कस स्टोइनिसने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मार्कस स्टोइनिसने ४७ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि ८ षटकारांच्या साहाय्याने ८९ धावांची खेळी केली.

लखनऊचा जोरदार विजय..

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून लखनऊ सुपर जायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून ८९ धावांची तुफानी खेळी केली.

तर क्रूणाल पंड्या ४९ धावा करून रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. लखनऊ सुपर जायंट्स संघाने या डावात प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ३ गडी बाद १७७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ईशान किशनने ४९ धावांची खेळी केली.

रोहित शर्मा ३७ धावा करून माघारी परतला. अंतिम षटकात मुंबई इंडियन्स संघाला ११ धावांची गरज होती. मात्र मुंबईचा संघ ५ धावांनी विजयापासून दूर राहिला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com