
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली होती. भारताची नेमबाज मनू भाकरने तर मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केली होता. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. यासह तिने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारातही कांस्यपदकाला गवसणी घातली होती. यासह एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदकांची कमाई करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली होती.
या शानदार कामगिरीनंतर तिला खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. दरम्यान शुक्रवारी भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते खेल रत्न पुरस्कार देण्यात आला आहे.
यासह भारताचा पॅरा अॅथलिट प्रवीणने पॅरिस पॅरिलिम्पिक स्पर्धेतील T64 श्रेणीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. प्रवीणलाही राष्ट्रपतींच्या हस्ते खेल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगचाही सन्मान करण्यात आला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला पदक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक १० गोल केले होते. त्याची ही शानदार पाहता त्याला खेल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
ज्योति याराजी (अॅथलेटीक्स) अन्नु रानी (अॅथलेटीक्स) नितू (बॉक्सिंग) स्वीटी (बॉक्सिंग) वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ) सलीमा टेटे (हॉकी) अभिषेक (हॉकी) संजय (हॉकी) जरमनप्रीत सिंग (हॉकी) सुखजीत सिंग (हॉकी) राकेश कुमार (पॅरा-आर्चरी) प्रिती पाल (पॅरा अॅथलेटीक्स) सचिन सरजेराव खिल्लारी (पॅरा अॅथलेटीक्स)
धर्मवीर (पॅरा अॅथलेटीक्स) प्रणव सूरमा (पॅरा अॅथलेटीक्स) एच होकातो सेमा (पॅरा अॅथलेटीक्स) सिमरन (पॅरा अॅथलेटीक्स) नवदीप (पॅरा अॅथलेटीक्स) थुलासिमाती मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन) नित्या श्री सुमाथी सिवान (पॅरा बॅडमिंटन) मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन) कपिल परमार (पॅरा जूडो) मोना अग्रवाल (पॅरा शूटिंग) रुबीना फ्रांसिस (पॅरा शूटिंग) स्वप्निल सुरेश कुसाले (शूटिंग) सरबजोत सिंग (शूटिंग) अभय सिंग (स्क्वॉश) साजन प्रकाश (स्विमिंग) अमन सहरावत (कुस्ती)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.