डॉमिनोज कडून मीराबाई चानूला लाईफटाईम फ्री पिझ्झा !

रौप्य पदक मिळाल्यानंतर मीराबाईने माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ऑलिम्पिक पदकाचे ध्येय गाठण्यासाठी किती तरी वर्ष पिझ्झा खाल्लेला नाही. आता मात्र पहिल्यांदा भरपूर पिझ्झा खाणार आहे.
मीराबाई चानूला डॉमिनोज कडून लाईफटाइम फ्री पिझ्झा !
मीराबाई चानूला डॉमिनोज कडून लाईफटाइम फ्री पिझ्झा !SaamTv
Published On

मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo olympic 2020) भारतासाठी खेळणारी भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक (Silver Medel) जिंकून क्रीडाक्षेत्रात इतिहास रचला आहे. देशाला 21 वर्षांपासून वेटलिफ्टिंगमध्ये पदकाची असलेली प्रतीक्षा चानूने संपवली आहे. देशासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रथम रौप्यपदक जिंकून देत देशाचे ऑलिम्पिकमधील खाते देखील तिने उघडले आहे.

हे देखील पहा -

मीराबाई चानूने ४९ किलो वजन गटात हे रौप्य पदक जिंकले असून तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क फेरीत एकूण 202 किलो वजन उचलून हे पदक मिळवले आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीने देशभरात आनंदाची आणि अभिनंदनाची लाट उसळली आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबाबत तिच्यावर समाज माध्यमावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्यांपासून ते मोठमोठ्या सिलेब्रिटीजपर्यंत सर्वांनी तिचे अभिनंदन केले आहे. तसेच अनेक शासकीय आणि खाजगी संस्थांनी तिला बक्षिसे जाहीर केली आहेत. डॉमिनोज इंडिया कंपनीने देखील तिच्यासाठी अनोखे बक्षीस जाहीर केले आहे.

रौप्य पदक मिळाल्यानंतर मीराबाईने माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ऑलिम्पिक पदकाचे ध्येय गाठण्याकरता मी अनेक वर्ष पिझ्झा खाल्ला नाही. आता मात्र मनसोक्त पिझ्झा खाणार आहे. तिच्या या वाक्याची दखल घेत बहुराष्ट्रीय व जगप्रसिद्ध पिझ्झा कंपनी डोमिनोज ने तिच्यासाठी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.

मीराबाई चानूला डॉमिनोज कडून लाईफटाइम फ्री पिझ्झा !
Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य

मीराबाई चानूला आयुष्यभरासाठी मोफत पिझ्झा देण्याची घोषणा डॉमिनोजकडून करण्यात आली आहे. डॉमिनोज इंडियाने अधिकृत ट्विटरद्वारे ट्विट करत मथळे आहे की, "तुम्ही म्हणालात आणि आम्ही ते ऐकलं. आम्हाला कधीच असं वाटणार नाही, की मीराबाई चानूला पिझ्झा खाण्यासाठी वाट बघावी लागेल. म्हणूनच आम्ही त्यांना आजीवन निःशुल्क पिझ्झा देणार आहोत" डोमिनोज कंपनीने ऑलिम्पिकवीर मीराबाई चानूला आजीवन मोफत पिझ्झा देण्याच्या घोषणेचे समाजमाध्यमातून जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com