दिल्ली : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत (ALL England Badminton Championship) भारताच्या लक्ष्य सेनने (Lakshya Sen) अंतिम फेरीत धडक मारली आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यने मलेशियाच्या ली जिया जियाचा (Malaysia's Li Jia Jia) पराभव केला. लक्ष्यने २१-१३ , १२-२१, २१-१९ अशी ली जी जियावर मात केली. हा सामना ७६ मिनिटे चालला. (Lakshya Sen Latest Marathi News)
जागतिक क्रमवारीत ११ व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्य सेनने पहिला सेट जिंकून सामन्यात शानदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये त्याची लय बिघडली. परिणामी मलेशियाच्या खेळाडूने दुसरा सेट सहज जिंकला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. तिसर्या सेटमध्ये एका क्षणी लक्ष्य १२-१६ असा पिछाडीवर होता, पण त्याने शानदार कामगिरी करत सामना जिंकला.
लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या (China) लू गुआंग जूने (Lu Guang Xu) याने पुढे चाल दिली (Walkover) वॉकओव्हर दिला. त्याचवेळी ली जी जियाने जपानच्या केंटो मोमोटाचे (Kento Momota) आव्हान मोडून काढले. याआधी उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेनने तिसऱ्या मानांकित अँटोनसेनवर २१-१६, २१-१८ असा विजय मिळवला होता. अँडर्स अँटोनसेन (Anders Antonsen) हा जागतिक चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा पदक विजेता आहे.
आता लक्ष्य सेनकडे अंतिम सामना जिंकून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. प्रकाश पदुकोण (१९८०) (Prakash Padukone) आणि पुलेला गोपीचंद (२००१) (Pullela Gopichand) यांच्या व्यतिरिक्त येथे भारतासाठी कोणीही विजेतेपद मिळवलेले नाही. तसेच सायना नेहवाल (Saina Nehwal) २०१५ मध्ये उपविजेती ठरली होती.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.