वृत्तसंस्था: भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याचे (Krunal Pandya) ट्विटर अकाऊंट सकाळच्या हॅक झाले होते. हॅकरनी कृणाल पांड्याचे ट्विटर अकाऊंट चक्क बिटकॉईन्सकरिता ( Bitcoins) विक्रीला देखील काढले होते. या बरोबरच हॅकरनले या ट्विटर अकाऊंटवर काही आक्षेपार्ह कमेंट देखील केले आहेत. हॅकरने कृणाल पांड्याच्या ट्विटर अकाऊंटवरून जवळपास 10 ट्विट केले होते. (Krunal Pandya Twitter account Hack)
हे देखील पहा-
मागील काही वर्षापासून अनेक क्रिकेटपटूंची सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात येत आहेत. ऑक्टोबर 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉट्सनचे (Shane Watson) ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते. याबरोबरच भारताचा माजी विकेटकिपर पार्थिव पटेलने (Parthiv Patel) याचे देखील हॅकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या पोस्टकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले होते.
कृणाल पांड्या संध्या आयपीएल 2022 (IPL 2022) ची तयारीला लागला आहे. मुंबई इंडियन्सने त्याला रिटेन केले नसल्यामुळे तो आता मेगा ऑक्शनमध्ये बोली लागण्याच्या प्रतिक्षेमध्ये राहणार आहे. कृणाल पांड्याने 2016 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास सुरूवात केली होती. यानंतर मुंबईने त्याला 2018 मध्ये 8.8 कोटी रूपये देऊन रिटेन केले होते. कृणाल पांड्याने आयपीएल 2022 च्या लिलावाकरिता (IPL 2022 Auction) आपले बेस प्राईस 2 कोटी ठेवली आहे. दरम्यान, त्याचा भाऊ हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) अहमदाबाद संघाने 15 कोटी रूपये देऊन आपल्या गोटात खेचले आहे. पांड्या अहमदाबादच्या संघाचे नेतृत्व देखील करणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.