केएल राहुल झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर का होता, त्याने स्वत: केला खुलासा

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. पुन्हा एकदा विराट कोहलीसह केएल राहुलही नसणार आहे.
K L Rahul
K L RahulSaam Tv
Published On

नवी दिल्ली: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. पुन्हा एकदा विराट कोहली (Virat Kohli) या दौऱ्यातही नसणार आहे. तर केएल राहुल देखील या मालिकेत टीम इंडियात नसणार आहे. खरंतर, कोहलीची टीममध्ये अनुपस्थिती चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे, तर दुसरीकडे केएल राहुल पुन्हा टीममध्ये नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत आहेत. कोहली झिम्बाब्वे दौऱ्यातून का बाहेर आहे याबद्दल कोणतीही अपडेट नाही. केएल राहुलने संघात सहभाग असणार का याबद्दल अपडेट दिली आहे आणि सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (KL Rahul Latest News)

K L Rahul
India's tour of Zimbabwe : झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

राहुलने (KL Rahul) एक खास ट्विट करून आपल्या तब्येतीची माहितीही दिली आहे. 'माझ्या फिटनेसशी संबंधित काही गोष्टी आहेत ज्या मला स्पष्ट करायच्या आहेत. जूनमध्ये माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध संघात पुनरागमन करेन या विचाराने मी सरावालाही सुरुवात केली, असं ट्विट राहुलने केले.

'माझा हेतू लवकरच फिट होण्याचा आहे जेणेकरून मी संघात निवडीसाठी उपलब्ध होऊ शकेन. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचे काहीही असू शकत नाही. मला स्वत:ला पुन्हा निळ्या जर्सीत बघायचे आहे.” असंही त्यांनी पुढे लिहिले आहे.

K L Rahul
CWG 2022 : चहावाल्याच्या मुलाचा कॉमनवेल्थ गेम्समध्ये 'तडका'; भारताला मिळवून दिलं सिल्व्हर मेडल, महाराष्ट्रात जल्लोष

झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताला ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. दुसरा सामना 20 ऑगस्टला आणि त्यानंतर तिसरा एकदिवसीय सामना 22 ऑगस्टला होणार आहे.

एकदिवसीय संघ:

शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com