Cricket News: बाबो! ७ ओव्हर्स, ७ मेडन अन् ७ विकेट्स.. IPL स्पर्धेपूर्वीच या स्टार खेळाडूने घातलाय धुमाकूळ

IPL 2023: या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सराव करायला देखील सुरुवात केली आहे.
kkr
kkr Twitter/IPL

Sunil narine: आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सराव करायला देखील सुरुवात केली आहे.

दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाने जोरदार कामगिरी करत विरोधी संघातील फलंदाजांना चेतावणी दिली आहे.

kkr
IND vs AUS : गिलचा फ्लॉप शो, सूर्यकुमारचं सरेंडर, भारताचा वनडेत सर्वात मोठा पराभव; नकोसा विक्रम नावावर

कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा सुनील नरेन हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. या हंगामात देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. (Latest sports updates)

दरम्यान या स्पर्धेपूर्वीच त्याने एका सामन्यात गोलंदाजी करताना ७ षटक गोलंदाजी केली. ज्यात त्याने ७ निर्धाव षटक टाकत ७ गडी बाद केले आहेत.

वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या एक लोकल टूर्नामेंटमध्ये त्याने हा कारनामा केला आहे. त्याने क्विन्स पार्क संघाकडून खेळताना क्लार्क युनायटेड संघाविरुद्ध खेळताना ही कामगिरी केली आहे. या जोरदार कामगिरीच्या बळावर विरोधी संघाचा डाव अवघ्या ७६ धावांवर संपुष्ठात आला.

kkr
IND vs AUS : गिलचा फ्लॉप शो, सूर्यकुमारचं सरेंडर, भारताचा वनडेत सर्वात मोठा पराभव; नकोसा विक्रम नावावर

सुनील नरेनने ७ षटकांमध्ये एकही रन न देता ७ गडी बाद केले. तर शॉन हेकलेटने १८ धावा खर्च करत २ गडी बाद केले. या सामन्यात क्विन्स पार्क संघाने ३ गडी बाद २६८ धावा करत १९२ धावांची आघाडी घेतली.

सुनील नरेनच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, १४८ टी-२० सामन्यांमध्ये त्याने १५२ गडी बाद केले आहेत. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ६ कसोटी सामन्यांमध्ये २१ गडी बाद केले आहेत. तर ६५ वनडेमध्ये ९२ आणि ५१ टी-२० सामन्यांमध्ये ५२ गडी बाद केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com