भारतीय संघाने यावर्षी इतिहास रचला आहे. अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. या विजयाची चर्चा जगभर सुरु असताना कौण बनेगा करोडपती या स्पर्धेतही टी-२० वर्ल्डकपबाबत एक सोपा प्रश्न विचारण्यात आला आहे
कौन बनेगा करोडपती शो मध्ये ४० हजार रुपयांसाठी सोपा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यांनी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा पाहिली असेल, त्यांना या प्रश्नाचं उत्तर आल्याशिवाय राहणार नाही. तर प्रश्न असा होता की, टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत यापैकी कुठल्या खेळाडूचा भारतीय संघात समावेश नव्हता? या प्रश्नासाठी ४ पर्याय देण्यात आले होते. ज्यात कुलदीप यादव, आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव या ४ खेळाडूंची नावं होती.
या प्रश्नाचं उत्तर होतं, आर अश्विन. कारण कुलदीप यादव, रविंद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव यांनी भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. तर आर अश्विनचा टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता.
आर अश्विनला २०२१ आणि २०२२ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाता स्थान देण्यात आलं होतं. २०२२ मध्ये ज्यावेळी भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्यावेळी आर अश्विनने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. या सामन्यात विराटने शानदार अर्धशतकी खेळी केली होती.
या स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. भारतीय संघाने तिसऱ्यांदा या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच या स्पर्धेची फायनल गाठली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकअखेर १७६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला १६९ धावा करता आल्या. हा सामना दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी गमवावा लागला .
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.