No Ball Controversy: SRH vs LSG सामन्यात प्रेक्षकांनी चक्क खेळाडूला केली मारहाण! फिल्डिंग कोचने सांगितलं नेमकं काय घडलं?

Jonty Rhodes On No Ball Controversy: सामना झाल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कोच जॉंटी रोड्सने एक मोठा खुलासा केला आहे.
Jonty Rhodes On No Ball Controversy
Jonty Rhodes On No Ball Controversysaam tv

SRH VS LSG, IPL 2023: हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात क्रिकेटसह आणखी खूप काही घडलं.

या सामन्यातील १९ व्या षटकात खेळाडूंच्या डग आऊटवर नट बोल्ड फेकल्याचे पाहायला मिळाले. या कारणामुळे सामना काही मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता.

दरम्यान सामना झाल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कोच जॉंटी रोड्सने एक मोठा खुलासा केला आहे.

Jonty Rhodes On No Ball Controversy
WATCH IPL: भडकलेल्या हैदराबादच्या फॅन्सने दिले कोहली... कोहलीचे नारे; LSG च्या खेळाडूंवर फेकले नट बोल्ड -VIDEO

कोचने केला मोठा खुलासा..

हा सामना सुरू असताना, सनरायझर्स हैदराबाद संघाच्या चाहत्यांनी लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या डगआऊटवर नट बोल्ड फेकल्याची बातमी समोर आली होती. आता या घटनेनंतर जॉंटी रोड्सने एक मोठा खुलासा केला आहे.

जॉंटी रोड्सने सामन्यानंतर ट्विट केले आणि त्यात लिहिले की, ' नट बोल्ड डगआऊटवर नव्हे तर खेळाडूंवर फेकले जात होते. प्रेरक मांकड लाँग ऑनला क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक त्याला मागून नट बोल्ड फेकून मारत होते.

या कारणामुळे झाला वाद..

तर झाले असे की, सनरायझर्स हैदराबाद संघाची फलंदाजी सुरू असताना, १९ वे षटक टाकण्यासाठी आवेश खान गोलंदाजीला आला होता. त्याने एक बॉल फुल टॉस टाकला.जो नो बॉल दिला गेला पाहिजे होता. मात्र अंपायरने नो बॉल देण्यास नकार दिला. त्यांनतर फलंदाजी करत असलेल्या अब्दुल समदने तिसऱ्या अंपायरकडे मागणी केली. मात्र तिसऱ्या अंपायरने देखील हा बॉल नो बॉल नसल्याचा निर्णय दिला. हा निर्णय पाहून फलंदाजी करत असलेले अब्दुल समद, आणि हेनरिक क्लासेन नाराज असल्याचे दिसून आले. तर सनरायझर्स हैदराबाद संघाचे चाहते संताप व्यक्त करताना दिसून आले. (Latest sports updates)

Jonty Rhodes On No Ball Controversy
IPL Points Table: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

लखनऊचा जोरदार विजय..

या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद १८२ धावांचा डोंगर उभारला होता. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक ४७ धावा केल्या.

तर आक्रमक फलंदाज अब्दुल समदने ३७ धावांची तुफानी खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून प्रेरक मांकडने नाबाद ६४ धावांची खेळी केली. तर शेवटी निकोलस पुरनने नाबाद ४४ धावांची खेळी करत लखनऊ सुपर जायंट्स संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com