Ravindra Jadeja Ball Tampering:जडेजाने बोटाला क्रिम लावल्याने वातावरण का तापलय? वाचा काय सांगतो क्रिकेटचा नियम

भारतीय संघ व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, जडेजाने आपल्या बोटांना क्रिम लावली होती.
Ravindra Jadeja Ball Tampering
Ravindra Jadeja Ball TamperingSaam tv
Published On

Ravindra Jadeja Ball Tampering:भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर- गावसकर कसोटीतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा राडा होतोच.

या मालिकेतील पहिल्याच सामन्यात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी रवींद्र जडेजाचा (Ravindra jadeja) व्हिडीओ व्हायरल करत त्याच्यावर बॉल टेम्परिंगचे आरोप केले आहेत.

भारतीय संघ व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, जडेजाने आपल्या बोटांना क्रिम लावली होती. ज्यावेळी १२० धावांवर ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज माघारी परतले होते. त्याच वेळी जडेजा गोलंदाजीला आला आणि जेव्हा तो बोटांना क्रीम लावत होता, तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.(Latest Sports Updates)

Ravindra Jadeja Ball Tampering
IND vs AUS Match Betting : भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅचवर सट्टा; पोलिसांनी भर मैदानातून ४ जणांना उचललं

या घटनेबाबत मॅच रेफ्रीने रोहित शर्मा आणि भारतीय संघ व्यवस्थापकांसोबत चर्चा केली. संघ व्यवस्थापकांनी मॅच रेफ्री अँडी पाईक्रॉफ्ट यांना मैदानावर घडलेला घटनाक्रम समजावून सांगितला. जडेजाने हे कृत्य बॉल टेंम्परिंगच्या हेतूने केले नव्हते.

तर त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. बोटाचे दुखणे घालवण्यासाठी तो बोटाला मलम लावत असल्याचे त्यांनी सांगितले.

Ravindra Jadeja Ball Tampering
IND VS AUS 1st Test : शतक झळकावताच रोहितला मिळाली वाईट बातमी!उर्वरित सामन्यांमध्ये चिंता वाढण्याची शक्यता

काय सांगतो क्रिकेटचा नियम?

अशा परिस्थितीत खेळाडूंनी तक्रार केल्यानंतर मॅच रेफ्री हस्तक्षेप करतील असं गरजेचं नसतं . तर मॅच रेफ्रीच्या निदर्शनात येताच, ते या प्रकरणात हस्तक्षेप करून तोडगा काढू शकतात.

क्रिकेटच्या नियमानुसार, गोलंदाज आपल्या बोटाला काही लावत असेल तर तत्पूर्वी त्याने अंपायरला विचारणं गरजेचं आहे. कारण चेंडू खराब होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com