IPL 2022: मुंबई इंडियन्समुळे बाकी संघ चिंतेत; फ्रँचायझींनी घेतला आक्षेप

आयपीएल (IPL 2022) फ्रँचायझींनी मुंबई इंडियन्सला स्पर्धेदरम्यान मिळणाऱ्या फायद्याबाबत त्यांच्या तक्रारी मांडल्या आहेत.
Mumbai Indians
Mumbai IndiansSaam TV

आयपीएल 2022 चे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र मुंबई आणि पुण्यात साखळी सामने खेळवले जाऊ शकतात, असे मानले जात आहे. आयपीएल 2022 चे लीग सामने मुंबईतील वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडियम तसेच पुण्यातील MCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित केले जाऊ शकतात. पण बीसीसीआयसमोर (BCCI) नवा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईत सामना होणार म्हणजे मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळावे लागणार आहे. वानखेडे हे मुंबईचे होम ग्राऊंड असल्याने त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. यामुळे बाकी फ्रँचायझींनी चिंता व्यक्त केली आहे. बाकी फ्रँचायझींना खात्री आहे की मुंबईला त्यांच्या होम ग्राऊंडवरती खेळण्याचा फायदा मिळू शकतो. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचे सामने घेण्यास फ्रँचायझींनी आक्षेप घेतला आहे.

आयपीएल (IPL 2022) फ्रँचायझींनी मुंबई इंडियन्सला स्पर्धेदरम्यान मिळणाऱ्या फायद्याबाबत त्यांच्या तक्रारी मांडल्या आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, “इतर कोणत्याही संघाला घरच्या मैदानात सामने खेळायला मिळत नाहीयेत. मुंबई इंडियन्सने आपले बहुतांश सामने वानखेडेवर खेळले तर ते चुकीचे ठरेल. हे मैदान वर्षानुवर्षे त्यांचे होम ग्राऊंड राहिले आहे. फ्रँचायझींनी ही चिंता व्यक्त केली आहे. मुंबई इंडियन्सला त्यांचे बहुतांश सामने डी.वाय.पाटील आणि पुण्यात खेळवण्यास त्यांना कोणतीही अडचण नाही. ब्रेबॉर्न स्टेडियमही ठीक आहे. बीसीसीआय या प्रकरणात लक्ष घालेल अशी आशा आहे.

Mumbai Indians
भारतीय क्रिकेटला ग्रहण! साहानंतर आणखी एका माजी खेळाडूचा मोठा दावा

10 संघ सराव कुठे करणार?

गेल्या मोसमात भारतात आयपीएल खेळवण्यात आले तेव्हा बीसीसीआयने निर्णय घेतला होता की कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार नाही. फ्रँचायझींनी याला समर्थन दिले होते. सामन्यांचे वाटप कसे करायचे याचा अंतिम निर्णय सध्या बीसीसीआयला घ्यायचा आहे. बीसीसीआयसमोर 10 संघांच्या सराव स्थळांचाही प्रश्न आहे. तीन मैदानांव्यतिरिक्त नवी मुंबईतील रिलायन्स क्रिकेट स्टेडियम आणि वांद्रे कुर्ला स्टेडियमचे पर्याय बीसीसीआयसमोर आहेत.

याआधी आयपीएल 2022 मध्ये 70 लीग सामने होणार असल्याची बातमी होती. त्यापैकी 55 मुंबईत आणि 15 पुण्यात होणार आहेत. कोरोनामुळे मुंबईतच सामने आयोजित करण्याची योजना आहे. अहमदाबादमध्ये बाद फेरीचा सामना होणार असल्याची बातमी आहे. 26 किंवा 27 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होऊ शकते. तसेच त्याचा अंतिम सामना मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होण्याची शक्यता आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com