IPL 2024, SRH vs MI: नेमकं चुकलं तरी कुठं? ही आहेत मुंबईच्या पराभवाची प्रमुख कारणं

Reasons Behind Mumbai Indians Defeat Aginst Sunrisers Hydrabad: मुंबई इंडियन्सला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. काय आहेत या पराभवाची प्रमुख कारणं?
IPL 2024 SRH vs MI: Reasons Behind Mumbai Indians Defeat
IPL 2024 SRH vs MI: Reasons Behind Mumbai Indians Defeattwitter

Causes Behind Mumbai Indians Defeat:

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पार पडला. या सामन्यात रेकॉर्ड्चा पाऊस पडला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने तुफान फटकेबाजी करत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली.

मुंबईला या सामन्यात जिंकण्यासाठी २७८ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबईला २४६ धावा करता आल्याा. हा सामना मुंबई इंडियन्स संघाला ३१ धावांनी गमवावा लागला आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सच्या या लाजिरवाण्या पराभवाची नेमकी कारणं काय? जाणून घ्या.

IPL 2024 SRH vs MI: Reasons Behind Mumbai Indians Defeat
SRH vs MI,IPL 2024: मुंबई इंडियन्समध्ये भाकरी फिरणार? सामन्यानंतर रोहित अन् आकाश अंबानीमध्ये काय चर्चा झाली?

नेतृत्वातील चुका..

या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात बऱ्याचश्या चुका केल्या. फलंदाजांसाठी सरस असलेल्या खेळपट्टीवर हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्याच षटकात हार्दिक पंड्याने ११ धावा खर्च केल्या. पुढील षटकात मफाकाने २२ धावा खर्च केल्या. हैदराबादने पहिल्या १० षटकात १६१ धावा केल्या होत्या. यादरम्यान जसप्रीत बुमराहने केवळ १ षटक टाकलं होतं.

टीम डेव्हिडने सोडलेला झेल...

या सामन्यात ट्रेविस हेडने शानदार फलंदाजी करत ६२ धावांची खेळी केली. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर ट्रेविस हेड स्वस्तात बाद होणार होता. मात्र टीम डेव्हिडने त्याचा झेल सोडला. या संधीचा फायदा घेत त्याने मुंबईच्या गोलंदाजांना चांगलंच चोपलं.

IPL 2024 SRH vs MI: Reasons Behind Mumbai Indians Defeat
Fastest 50 in IPL: हैदराबादमध्ये आलं धावांचं वादळ;अभिषेक शर्माने झळकावले सर्वात जलद अर्धशतक

हार्दिक पंड्याची संथ फलंदाजी...

या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजयासाठी २७८ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी आक्रमक सुरुवात केली होती. मात्र इशान किशन बाद झाल्यानंतर रोहितही बाद होऊन माघारी परतला. जो फलंदाज फलंदाजीला येत होता तो फलंदाज २०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाज करत होता. मात्र हार्दिक पंड्या १२० च्या स्ट्राईक रेटने धावा करत माघारी परतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com