आयपीएल 2022 चा (IPL 2022) चॅम्पियन कोण? हे लवकरच समजणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक वेळी प्रमाणे या हंगामातही चार संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. ज्यामध्ये गुजरात टायटन्स (Gujrat Titans), राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा समावेश आहे. सध्या भारतावर पावसाचे संकट आहे. त्यामुळे प्लेऑफचे सामने लक्षात घेऊन नवे नियम जारी करण्यात आले आहेत. हे नियम क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 ला देखील लागू करण्यात आले आहेत. या सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. (IPL 2022 Playoff)
मात्र स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी 30 मे राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. आज आयपीएलची पहिली क्वालिफायर्स आजपासून कोलकातामध्ये सुरू होणार आहेत आणि हवामान खात्याने येथे ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. नवीन नियमांनुसार, पावसामुळे आजचा सामना रद्द झाला, तर साहजिकच गुजरात टायटन्सला विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश मिळणार आहे.
आज गुजरात आणि राजस्थान यांच्या प्लेऑफचा पहिला सामना आहे. जिंकणार संघ थेट अंतीम सामन्यात प्रवेश करतो तर हारलेल्या संघाला आणखी एक संघी असते. दुसरा प्लेऑफचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये होणार आहे. यांच्यातील विजयी संघ पहिल्या सामन्यातील हारलेल्या संघासोबत खेळणार आहे. लखनौ आणि गुजरात हे दोन संघ यंदाच्या हंगामात नव्याने दाखल झालेले आहेत. आणि या दोन्ही संघांकडे विजयाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जाते.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.