रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) यांच्यात मंगळवारी आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 13 वा सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होणार आहे. पहिले दोन्ही सामने जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्स आत्मविश्वासाने मैदानात उतरेल आणि विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याच्या उद्देश असेल. राजस्थान संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
पहिल्या सामन्यात राजस्थानने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात आरआरने मुंबईचा 23 धावांनी पराभव केला. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने पहिला सामना गमावल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सवर तीन गडी राखून विजय मिळवला होता. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक आहे त्यामुळे दोन्ही संघांना त्याचा फायदा होईल.
बटलरचा फॉर्म संघासाठी जमेची बाजू
राजस्थानकडून सलामीवीर जॉस बटलर शानदार फॉर्मात आहे. तो कोणत्याही गोलंदाजांचा चांगलचा समाचार घेत असतो. शनिवारी झालेल्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात बटलरने शतकी खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला होता. बटलर एका बाजूने किल्ला लढवत असताना त्याला देवदत्त पडिकल आणि यशस्वी जयस्वाल यांची साथ मिळाली पाहिजे. पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला मुंबईविरुद्ध स्वस्तात बाद झाला होता.
मॅक्सवेलच्या खेळण्यावर टांगती तलवार
श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगा आरसीबीच्या गोलंदाजीचे नेतृत्व करत आहे. त्यांच्याशिवाय डेव्हिड विली, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज यांनाही चांगली कामगिरी केली आहे. आरसीबीला राजस्थानच्या फलंदाजांवर अंकुश ठेवायचा असेल तर डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट हर्षल पटेलला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. आरसीबीसाठी गोलंदाजीपेक्षा फलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. सलामीवीर अनुज रावतला सातत्य दाखवता आलेले नाही, तर डु प्लेसिसला पुन्हा मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल या सामन्यासाठी उपलब्ध असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जॉस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (WK/C), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रणंद कृष्णा.
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, वनइंडू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.