IPL 2021: RCBच्या पराभवानंतर दीपिका पदुकोणचं 2010 चे ट्विट व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) सीझन 14 च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात निराशाजनक केली आहे.
IPL 2021: RCBच्या पराभवानंतर दीपिका पदुकोणचं 2010 चे ट्विट व्हायरल
IPL 2021: RCBच्या पराभवानंतर दीपिका पदुकोणचं 2010 चे ट्विट व्हायरल Saam TV
Published On

RCB vs KKR: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) सीझन 14 च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात निराशाजनक केली आहे. कारण कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या हातून त्यांना 9 विकेटने पराभव स्वीकारावा लागला आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली आरसीबी केवळ 92 धावा करुन ऑल आऊट झाली. यानंतर, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचे (Deepika Padukon) 11 वर्षांपुर्वीचे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.

दीपिका पदुकोण आयपीएलच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये आरसीबीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये नेहमी उपस्थित राहायची. 2010 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यादरम्यान, जेव्हा आरसीबीने राजस्थानला केवळ 92 धावांवर बाद केले, तेव्हा दीपिकाने राजस्थान रॉयल्सला ट्विटरवरुन ट्रोल केले होते. आता तेच ट्विट सोशियल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिपीकाने ट्विट केले होते, "92 !! हा काय स्कोअर आहे? त्या काळात, कुंबळेच्या नेतृत्वाखाली, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने तो सामना 10 गडी राखून जिंकला होता, जॅक कॅलिसला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. आता 2010 च्या त्याच सामन्याचे ट्विट व्हायरल होत आहे, कारण सोमवारी RCBचा संघ 92 धावांवर गुंडाळला गेला.

सोमवारी, आरसीबीच्या फलंदाजांनी केकेआरच्या गोलंदाजां समोर अक्षरश: नांग्या टाकल्या. आरसीबी सध्या आयपीएल मध्ये 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. या सामन्यात ना कर्णधार विराट कोहलीने फलंदाजी केली ना एबी डिव्हिलियर्स आपली छाप सोडू शकला. त्याचवेळी ग्लेन मॅक्सवेलचे वादळ येण्यापूर्वीच थांबले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com