MI vs PBKS: मोठ्या बदलांसह मुंबई मैदानात उतरणार? काय असेल Playing 11

आयपीएल 2021 चा हा 42 वा सामना अबुधाबीमध्ये खेळला जाणार आहे. जेव्हाही दोन्ही संघ समोरासमोर आले, तेव्हा दोघांमध्ये बरोबरीची स्पर्धा झाली आहे.
MI vs PBKS: मोठ्या बदलांसह मुंबई मैदानात उतरणार? काय असेल Playing 11
MI vs PBKS: मोठ्या बदलांसह मुंबई मैदानात उतरणार? काय असेल Playing 11Saam TV
Published On

28 सप्टेंबर रोजी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये डबल हेडर खेळला जाणार आहे. आजच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने येणार आहेत. आयपीएल 2021 चा हा 42 वा सामना अबुधाबीमध्ये खेळला जाणार आहे. जेव्हाही दोन्ही संघ समोरासमोर आले, तेव्हा दोघांमध्ये बरोबरीची स्पर्धा झाली आहे. मुंबई इंडियन्सला गेल्या 3 सामन्यांमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अगदी शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबईचा 54 धावांनी पराभव केला. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ विजयाच्या ट्रॅकवर परतण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा संघात एकापेक्षा अधिक बदल करू शकतो. पंजाबविरुद्धच्या सामन्यात इशान किशनला डावलले जाऊ शकते. त्याच्या जागी सौरभ तिवारीला संधी मिळण्याची शक्याता आहे.

MI vs PBKS: मोठ्या बदलांसह मुंबई मैदानात उतरणार? काय असेल Playing 11
कुणीही उठावं आणि चिखलफेक करावी हे सहन करणार नाही- हसन मुश्रिफ

त्याचवेळी पंजाब किंग्सने शेवटच्या सामन्यात 125 धावांचा छोटा स्कोअर करून सामना जिंकला होता. त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव केला होता. अशा परिस्थितीत पंजाब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुल प्लेइंग 11 बदलण्याच्या मूडमध्ये नसेल. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी मुंबई आणि पंजाब दोघांनाही हा सामना जिंकावा लागणार आहे. जरी, हा सामना दोन्ही संघासाठी करो किंवा मरो नाही, परंतु हा सामना गमावणाऱ्या संघासाठी, इतर सर्व सामने करा किंवा मरो असणार आहेत.

पंजाबचा संभाव्य संघ

लोकेश राहुल (C/WK), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, एडन मार्कराम, दीपक हुडा, निकोलस पूरन, हरप्रीत ब्रार, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस.

मुंबईचा संभाव्य संघ

रोहित शर्मा (C), क्विंटन डी कॉक (WK), सूर्यकुमार यादव, इशान किशन/सौरभ तिवारी, हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या, अॅडम मिल्ले, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com