Cricket In Olympics 2023: ऑलिम्पिकमध्ये रंगणार टी-२० क्रिकेटचा थरार! १२८ वर्षांनंतर मिळाली एन्ट्री

Los Angeles Olympics 2028 Cricket: तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री मिळाली आहे.
Saam Tv News
Saam Tv News LA 2028 Olympics
Published On

Cricket in 2028's Los Angeles Olympics:

अमेरिकेतील लॉस एंजिलिसमध्ये ऑलिम्पिक २०२८ स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेत क्रिकेटचा देखील करण्यात आला आहे. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघाच्या मिटींगमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

या मिटींगमध्ये क्रिकेटसह अन्य ४ खेळाचांही ऑलिम्पिकमध्ये समावेश केला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑलिम्पिक २०२८ स्पर्धेत क्रिकेटसह, बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, स्क्वाश आणि लॅक्रोसचा देखील समावेश केला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघाच्या कार्यकारी मंडळाने लॉस एंजिलिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५ नव्या खेळांचा समावेश करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. अखेर सोमवारी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. (Latest sports updates)

१२८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचं पुनरागमन..

यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये केवळ १ वेळेस क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. १९०० साली पॅरिसमध्ये झालेल्या स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुवर्णपदकाची लढत रंगली होती. या सामन्यात इंग्लंडने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.

Saam Tv News
Virat Kohli Viral Video: 'I Love You विराट..',लाईव्ह कार्यक्रमात अरिजितने हाक मारताच विराटची भन्नाट रिॲक्शन व्हायरल,Video

या स्पर्धेचं आयोजन टी-२० फॉरमॅटमध्ये केलं जाणार आहे. ज्यात पुरूष आणि महिला इव्हेंटचा समावेश असेल. आतापर्यंत ६-६ संघांना प्रवेश मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

क्रिकेटसह या खेळांना मिळाली एन्ट्री..

या स्पर्धेत क्रिकेटसह बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, स्क्वाश आणि लॅक्रोस या खेळांना देखील हिरवं कंदील दाखवण्यात आलं आहे.

Saam Tv News
Virat- Anushka Viral Video: इशारों इशारों में.. भारत- पाक सामन्यानंतर विरूष्काचा तो Video व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com