Ayhika Mukherjee: भारताच्या आयिखा मुखर्जीचा कोरियाच्या वर्ल्ड नंबर ८ शिन युबीन वर दणदणीत विजय

Ayhika Mukherjee News In Marathi: भारताची स्टार टेबलटेनिसपटू आयिखा मुखर्जीने शानदार विजयाची नोंद केली आहे.
Ayhika Mukherjee: भारताच्या आयिखा मुखर्जीचा कोरियाच्या वर्ल्ड नंबर ८ शिन युबीन वर दणदणीत विजय
ayhika mukherjeetwitter
Published On

आशियाई स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक जिंकणारी भारताची आयिखा मुखर्जीने कझाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या टेबल टेनिस आशियाई चॅम्पिअनशिपमधील एकेरी सामन्यात जगातल्या आठव्या स्थानी असणाऱ्या कोरियन शिन युबीनवर दणदणीत विजय मिळवून आपल्या उत्कृत्ष्ट खेळीचे प्रदर्शन केले.

यादरम्यान तिने ११-९, ७-११, १२-१०, ७-११, ११-७ अशी शानदार कामगिरी केली. कोरिया संघासोबत पहिला सामना बरोबरीवर संपल्याने दुसरीत सामन्यात पहिल्यांदाच एकेरी सामना खेळत असलेल्या आयिखाने जगातल्या उत्कृष्ट आणि सामना खेळण्यासाठी कठीण असलेल्या खेळाडूंसमोर आपला वर्चस्व गाजवत पहिला सामना जिंकला. शिन युबीन ही २० वर्षीय खेळाडू असून ती पॅरिस ऑलिम्पिकच्या सेमीफायनल स्पर्धेत आपली जागा निर्माण केली होती.

शिन युबीन आणि जीओन जिजही हे कोरियन टेबल टेनिस संघाचे महत्त्वाचे खेळाडू असून जीओन जिजही ही जागतिक पातळीवर १६ वे स्थान गाठले आहे. पश्चिम बंगालच्या आयिखा मुखर्जीवर पहिला सामना जिंकण्याची जबाबदारी देण्यात आली होती, जेणेकरून माणिक बात्रा ही जीओन सोबत पुढचा सामना आरामात खेळूत सामना जिंकून पॉईंट्स डबल

करण्यासाठी प्रयत्न करत होती. दुखापतीनंतर मैदानावर आलेल्या भारताच्या जागतिक पातळीवर मोठे स्थान निर्माण करणारी श्रीजा अकुला , मैदानावर येताच आपला पहिलाच सामन्यात आरामात विजय मिळवला.

Ayhika Mukherjee: भारताच्या आयिखा मुखर्जीचा कोरियाच्या वर्ल्ड नंबर ८ शिन युबीन वर दणदणीत विजय
अखेर झुकावं लागलं! पाकिस्तान नव्हे, तर या देशात होणार Champions Trophy ची फायनल

तिसऱ्या महत्वाच्या सामन्यात झुंझ देत आयिखाने २-८ वरून १२-१० अशी लढत देऊन आपला विजय नोंदवला. आयिखा ही दोन वेळची आशियाई मेडलिस्ट असून तिने आपल्या कामगिरीने स्वतःच्या उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन केले. आयिखा हिने आपल्या भावनांवर संयम ठेवत आणि स्वतःच्या माईंड गेमवर विश्वास ठेवत शिंनच्या कठीण खेळीला प्रतिसाद देत फक्त वेळ आल्यावरच अटॅक करून स्वतःला हाय प्रेशर सामन्यात संयमी ठेवले.

या सामन्यात तिने योग्यवेळी योग्य शॉट मारण्यावर भर दिला. बॅक हॅन्ड शॉट्स खेळत शिन सारख्या कमी उंचीच्या खेळाडूला ताण देऊन तिला शॉट्स खेळण्यासाठी जास्त मेहनत घ्यायला लावत आयिखाने आपली शक्कल लढवत शिनला सामन्यात रोखले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com