भारतीय ऑलिंपिकपटूंना १७ जुलै पूर्वी टोकियोत प्रवेश नाही

भारताच्या ऑलिंपिक पात्र संघातील पहिली तुकडी १७ जूलै रोजी टोकियोसाठी रवाना होणार आहे
भारतीय ऑलिंपिकपटूंना १७ जुलै पूर्वी टोकियोत प्रवेश नाही
भारतीय ऑलिंपिकपटूंना १७ जुलै पूर्वी टोकियोत प्रवेश नाही- Saam Tv
Published On

नवी दिल्ली : भारताच्या ऑलिंपिक Olympics पात्र संघातील पहिली तुकडी १७ जूलै रोजी टोकियोसाठी Tokyo रवाना होणार आहे. त्यापूर्वी टोकियोत दाखल होण्यास संयोजकांकडून मनाई करण्यात आल्याची माहिती भारतीय ऑलिंपिक संघटनेचे IOA अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी दिली आहे. Indian Olympic Contingent will leave for Tokyo on Seventeenth July

भारताच्या ऑलिंपिक संघटनेची खेळाडूंनी १४ जूलै रोजी टोकियोसाठी निघून तीन दिवसीय कठोर विलगीकरण पूर्ण करावे अशी इच्छा होती. परंतू, टोकियो आयोजक समितीचे सदस्य केट योनेयामा यांच्याकडून प्राप्त झालेल्या झालेल्या पत्रानूसार भारताला अजूनही परवानगी मिळणे बाकी असल्याने १७ जूलैला पाठविण्यावाचून पर्यायच उरलेला नसल्याचे बत्रा यांनी म्हटले आहे.तसेच १७ जूलैला नेमके किती पाठविले जातील याबाबतही बत्रा यांनी खुलासा केलेला नाही.

टोकियोत सातत्याने कोरोनो रुग्णांची वाढ होत असून ,नुकतीच स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टोकियोत २३ जूलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आणीबाणीचीही घोषणा करण्यात आली आहे.विदेशात सराव करत असणाऱ्या खेळाडूंवर मात्र कुठलेही निर्बंध नसतील. संयोजकांच्या या निर्णया बद्दल बत्रा यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com