कर्णधार हार्दिक पंड्याने हर्षल- ईशानला केली शिवीगाळ ? ट्विटरवर व्हिडिओ झाला व्हायरल

भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे.
Hardik Pandya
Hardik Pandyasaam tv
Published On

नवी दिल्ली : भारत आणि आर्यलॅंड यांच्यात झालेल्या दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० ने बाजी मारली. कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या संघाचं नेतृत्व केलं. आर्यलॅंड विरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला विजय संपादन करता आल्याने कर्णधार पंड्याचे क्रिकेट विश्वातून कौतुक केलं जात आहे. मात्र, हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर (twitter video) व्हायरल झाला आहे. हार्दिकने भारताचा गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) आणि सलामीवीर फलंदाज ईशान किशनला (Ishan Kishan) शिवीगाळ केला असल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. हा व्हिडिओ भारत आणि आर्यलॅंडमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Hardik Pandya
IND vs IRE 2nd T20: चौकार-षटकारांचा पाऊस, भारतानं मारली बाजी; आयर्लंडचे फलंदाजही शेवटपर्यंत झुंजले

आर्यलॅंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये भारताने चार धावांनी विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारताचं क्षेत्ररक्षण सुरु असताना कर्णधार हार्दिक पंड्याने रागाच्या भरात हर्षल पटेल आणि ईशान किशनला शिवीगाळ केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. जेव्हा टीम इंडियाचे दोन रिव्यू वाया गेले, त्यावेळी कर्णधार पंड्या नाराज झाला होता. आर्यलॅंडची फलंदाजी सुरु असताना ११ व्या षटकात हर्षल पटेल गोलंदाजी करत होता. त्यावेळी हर्षलने धीम्या गतीचा चेंडू फेकल्याने फलंदाजाच्या पॅडला लागला.

त्यानंतर तो चेंडू विकेटकिपर ईशान किशनकडे पोहोचला. हर्षल-ईशानने सल्ला दिल्यानंतर हार्दिकने रिव्यू घेतला. परंतु रिव्यू घेण्याच निर्णय चुकीचा ठरला. हाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रिल्पे केल्यावर शिवीगाळ केल्याचा आवाज येत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लिहिलंय की, हार्दिक पंड्याने शिवीगाळ केली आहे. मात्र, याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com