Team India : भारतीय संघासाठी खूशखबर; टी २० वर्ल्डकपमध्ये थेट 'एन्ट्री'

टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंग झालं असलं तरी, सेमिफायनलपर्यंत पोहोचण्याचा फायदा संघाला झाला आहे.
Team India
Team IndiaICC/twitter

India Women's National Cricket Team : भारतीय महिला क्रिकेट संघासाठी खूशखबर आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ यंदाच्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेत सेमिफायनलपर्यंत पोहोचला होता. मात्र, सेमिफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंग झालं असलं तरी, सेमिफायनलपर्यंत पोहोचण्याचा फायदा संघाला झाला आहे. (Cricket News)

पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये बांगलादेशात होणाऱ्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला थेट प्रवेश मिळाला आहे. वर्ल्डकप २०२३ मधील ग्रुपमध्ये अव्वल सहामध्ये राहणाऱ्या संघांना वर्ल्डकप स्पर्धेत थेट प्रवेश मिळतो.

भारतीय महिला क्रिकेट संघाने ग्रुपमध्ये पहिल्या तीन संघांमध्ये स्थान मिळवलं होतं. अशातच दोन्ही ग्रुपमधील अव्वल सहा संघ बांगलादेश आणि पाकिस्तानकडे यजमानपद असलेल्या पुढील वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

Team India
VIDEO : मुंबईच्या वानखेडे मैदानात सचिन तेंडुलकरचा पुतळा; 'क्रिकेटचा देव' काय म्हणाला?

वर्ल्डकप स्पर्धेसाठी ग्रुप १ मधून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका पात्र ठरले आहेत. तर ग्रुप २ मधून इंग्लंड, भारत आणि वेस्टइंडीज हे संघ पात्र ठरले आहेत. या टी २० वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेले श्रीलंका आणि आयर्लंड हे दोन संघ पुढील वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरलेले नाहीत. आता पुढील वर्ल्डकप स्पर्धेसाठी आयसीसीकडून पात्रता फेरीचं आयोजन करण्यात येईल. त्यातून दोन संघांची निवड होईल.

Team India
Virat Kohli Records : विराट कोहली पुन्हा नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर! ठरणार अशी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू

टी २० वर्ल्डकप स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय संघाची कामगिरी

पाकिस्तानविरुद्ध ७ गडी राखून विजय

वेस्ट इंडीजविरुद्ध ६ गडी राखून विजय

इंग्लंडकडून ११ धावांनी पराभूत

आयर्लंडवर ५ धावांनी विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमिफायनलमध्ये ५ धावांनी पराभव

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com