Sachin Tendulkar Statue in Wankhede Stadium
Sachin Tendulkar Statue in Wankhede Stadium SAAM TV

VIDEO : मुंबईच्या वानखेडे मैदानात सचिन तेंडुलकरचा पुतळा; 'क्रिकेटचा देव' काय म्हणाला?

Sachin Tendulkar Statue in Wankhede Stadium : मुंबईतील वानखेडे मैदानात महान क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

Sachin Tendulkar Statue in Wankhede Stadium : मुंबई क्रिकेट असोसिएशननं एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील वानखेडे मैदानात महान क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

सचिन तेंडुलकर २४ एप्रिल रोजी ५० वर्षांचा होईल. तसेच यावर्षी नोव्हेंबरमध्ये क्रिकेटमधून घेतलेल्या निवृत्तीला १० वर्षे पूर्ण होणार आहेत. नोव्हेंबर २०१३ मध्ये वानखेडे मैदानातच सचिन वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. (Cricket News)

Sachin Tendulkar Statue in Wankhede Stadium
Virat Kohli Records : विराट कोहली पुन्हा नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर! ठरणार अशी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू

वानखेडे मैदानात एमसीएकडून (MCA) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आगळावेगळा सन्मान केला जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून मैदानात क्रिकेटच्या देवाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून सचिनच्या पुतळ्याचं अनावरण २०२३ मध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान करण्यात येणार आहे.

Sachin Tendulkar Statue in Wankhede Stadium
Meg Lanning: वर्ल्डकप विजयाची हॅट्रिक करताच लेनिंगने रचला इतिहास!मोठ्या विक्रमात रिकी पॉंटिंग आणि धोनीला सोडलय मागे

सचिननं सहमती दर्शवली

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी सांगितले की, वानखेडे मैदानात पहिल्यांदाच पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेटमधील योगदानाचं स्मरण करून देईल. सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. मी त्यांच्याशी तीन आठवड्यांपूर्वीच याविषयी बोललो होतो, त्यावर त्यांनीही सहमती दर्शवली आहे, असे काळे यांनी सांगितले.

क्रिकेटच्या देवानं काय सांगितलं?

सचिन तेंडुलकर म्हणाला की, 'माझ्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे. वानखेडे मैदानातच मी पहिल्यांदा रणजी सामना खेळलो. मी व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात करण्याआधी याच मैदानात माझे प्रशिक्षक आचरेकर सरांनी मला फटकारले होते. त्यानंतर मी खऱ्या अर्थाने क्रिकेटपटू म्हणून घडलो. हे ठिकाण माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या खूप आठवणी आहेत. वानखेडे मैदानात माझा पुतळा उभारणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.'

वानखेडे मैदानातच भारतानं जिंकला होता वनडे वर्ल्डकप

वनडे वर्ल्डकप २०११ चा अंतिम सामना मुंबईच्या याच वानखेडे मैदानात झाला होता. भारताने श्रीलंकेला पराभूत करून विश्वविजेतेपद जिंकले होते. यजमानपद भूषवणाऱ्या भारताच्या संघानंच वर्ल्डकप जिंकला होता. तशी कामगिरी करणारा हा पहिलाच संघ होता. याआधी कोणत्याही संघानं मायदेशात वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले नव्हते. त्याचबरोबर वर्ल्डकप जिंकण्याचं सचिनचं स्वप्न पूर्ण झालं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com