Rohit Sharma Record: मैदानावर उतरताच हिटमॅन रचणार इतिहास! सचिन,धोनीसारख्या दिग्गजांच्या यादीत करणार प्रवेश

India vs Srilanka, Asia Cup Final 2023: या सामन्यात उतरताच रोहित शर्माच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे.
India vs Srilanka, Asia Cup Final 2023:
India vs Srilanka, Asia Cup Final 2023:Saam tv news

India vs Srilanka, Asia Cup Final 2023, Rohit Sharma Record:

आशिया चषकाचा अंतिम सामन भारत विरूद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना आज दुपारी ३ वाजता कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. श्रीलंकेचा संघ पाकिस्तान आणि बांगलादेशला पराभूत करून अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

तर दुसरीकडे भारतीय संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. दरम्यान अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरताच कर्णधार रोहित शर्माच्या नावे एका खास रेकॉर्डची नोंद होणार आहे.

India vs Srilanka, Asia Cup Final 2023:
IND vs SL, Weather Update: भारत - श्रीलंका सामन्यावर पावसाचे सावट! सामना रद्द झाल्यास कसा लावला जाईल निकाल?

श्रीलंकेविरूद्ध होणारा सामना हा रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीतील २५० वा सामना असणार आहे. तसेच त्याच्या आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतील ४५० वा सामना असणार आहे. या रेकॉर्डसह रोहित शर्मा सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनीसारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश करणार आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. तर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

India vs Srilanka, Asia Cup Final 2023:
Ind vs SL, Asia Cup Final: केव्हा,कुठे अन् कधी रंगणार भारत- श्रीलंका अंतिम सामना? जाणून घ्या एकाच क्लिकवर

सचिन तेंडुलकरने ६६५ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या एमएस धोनीने ५३५ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराट आतापर्यंत ५०५ सामने खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. तर राहुल द्रविड ५०४ सामने खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. (Latest sports updates)

असा राहिलाय रोहितचा रेकॉर्ड..

श्रीलंकेविरूद्धचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरताच रोहित शर्मा भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणारा पाचवा फलंदाज ठरणार आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत ४४९ सामन्यांमध्ये १७५६१ धावा केल्या आहेत.

यादरम्यान त्याने ४४ शतके झळकावली आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ३ शतके झळकावली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com