Ind Vs NZ T20 Series: करो या मरो मुकाबल्यासाठी हार्दिकची मोठी चाल, Toss जिंकला; अशी आहे प्लेईंग 11

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार असून नाणेफेकीचा कौल टीम इंडियाने जिंकला आहे.
Hardik Pandya
Hardik Pandya Saamtv

Ind Vs NZ 3rd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा आणि निर्णायक सामना आज सुरू आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार असून नाणेफेकीचा कौल टीम इंडियाने जिंकला आहे. नाणेफेक जिंकत भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

मालिका जिंकण्यासाठी आजचा सामना भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. (Team India)

Hardik Pandya
Malegaon Crime : शेतात एकटीच गेली होती महिला; अज्ञात व्यक्तीनं केलं क्रूर कृत्य, धक्कादायक घटनेनं खळबळ

भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.सध्या दोन्ही संघांमधील मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.

Hardik Pandya
Nandurbar Accident : नंदूरबारमध्ये भीषण अपघात; गरोदर मातांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली

अहमदाबाद येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकेवर कब्जा करेल. या मालिकेतील पहिला सामना रांची येथे खेळला गेला, ज्यात न्यूझीलंडने २१ धावांच्या फरकाने विजय मिळवला. यानंतर दुसरा सामना लखनौमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिका 1-1 अशी बरोबरीत केली.

त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल.

न्यूझीलंड रचणार का इतिहास..

भारताला भारतात पराभूत करणे कधीही सोपे नाही. फार कमी संघ हे करू शकले आहेत. न्यूझीलंडकडे आज ही संधी आहे. या संघाने आजचा सामना जिंकला तर टीम इंडिया आपल्या घरच्या मैदानावर इतिहास रचेल. मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील या संघात हा पराक्रम करण्याची ताकद आहे न्यूझीलंडने भारतात कधीही तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकलेली नाही.

IND vs NZ: आजचा प्लेइंग इलेव्हन

भारत: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, शिवम मावी, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com