T20 WC 2024 Final:...तर भारत - अफगाणिस्तानमध्ये होणार T-20 वर्ल्डकपची फायनल! वाचा समीकरण

India VS Afganistan, T20 World Cup 2024 Final: बांगलादेशला पराभूत करत अफगाणिस्तानने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
T20 World Cup 2024 :...तर भारत - अफगाणिस्तानमध्ये होणार T-20 वर्ल्डकपची फायनल! वाचा समीकरण
india vs afghanistantwitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाल आहेत. ५२ सामन्यांनंतर अखेर सेमिफायनलमध्ये जाणारे ४ संघ ठरले आहेत. भारतीय संघासह, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तानने सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमिफायनलच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे.

तर दुसऱ्या सेमिफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये फायनलचा सामना होऊ शकतो. कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

भारत-इंग्लंडमध्ये रंगणार सेमिफायनलचा सामना

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये जाणारे चारही संघ ठरले आहेत. ठरलेल्या वेळापत्रकानुसार, २७ जून रोजी पहिल्या सेमिफानलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरु होईल. तर भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा सेमिफायनलचा दुसरा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होईल. जो संघ जिंकेल तो संघ २९ जून रोजी होणाऱ्या फायनलमध्ये खेळताना दिसेल.

T20 World Cup 2024 :...तर भारत - अफगाणिस्तानमध्ये होणार T-20 वर्ल्डकपची फायनल! वाचा समीकरण
IND vs AUS, Turning Point: इथेच सामना फिरला! वाचा टीम इंडियाच्या शानदार विजयाचे 3 टर्निंग पॉईंट

भारत- अफगाणिस्तानमध्ये होणार फायनल?

अफगाणिस्तानचा संघ पहिल्या सेमिफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना करताना दिसेल. अफगाणिस्तानने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशला हरवत सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला या सामन्यात जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेची पडती बाजू म्हणजे, दक्षिण आफ्रिकेने गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये रडत रडत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तान लो स्कोरिंग सामने जिंकले आहेत. त्यामुळे अफगणिस्तानला फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

T20 World Cup 2024 :...तर भारत - अफगाणिस्तानमध्ये होणार T-20 वर्ल्डकपची फायनल! वाचा समीकरण
IND vs AUS,Highlights: पराभवाचा बदला घेतला! ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडत टीम इंडियाची सेमिफायनलमध्ये धडक

तर दुसरीकडे भारतीय संघाने या स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतीय संघाने सेमिफायनलचं तिकीट मिळवलं आहे. सेमिफायनलमध्ये भारतीय संघाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे हा सामना रद्द झाल्यास अव्वल स्थानी असलेला भारतीय संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे भारत- अफगाणिस्तानमध्ये फायनलचा सामना होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com