emerging  asia cup 2023
emerging asia cup 2023saam tv

Emerging Asia Cup 2023: भारत- पाकिस्तानात रंगणार आशिया कपच्या फायनलचा थरार; जाणून घ्या केव्हा अन् कुठे रंगणार सामना

India vs Pakistan Final: श्रीलंकेत उदयोन्मुख आशिया चषक २०२३ स्पर्धेचा थरार सुरू आहे.
Published on

Emerging Asia Cup 2023 IND vs PAK Final 2023: आशिया चषक २०२३ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून येत्या ३० ऑगस्टपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेपूर्वी श्रीलंकेत उदयोन्मुख आशिया चषक २०२३ स्पर्धेचा थरार सुरू आहे.

ही स्पर्धा देखील अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना भारतीय अ आणि पाकिस्तान अ या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.

emerging  asia cup 2023
IND vs WI 2nd Test: खेळाडू असावा तर असा; विराटला भेटताच या खेळाडूच्या आईला अश्रू अनावर; मिठी मारत म्हणाली.. -VIDEO

बांगलादेशला पराभूत करत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश..

उदयोन्मुख आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा दुसरा सामना भारतीय अ आणि बांगलादेश अ या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या लो स्कोरिंग सामन्यात भारतीय अ संघाचा डाव ४९.१ षटकात २११ धावांवर संपुष्टात आला.

या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश अ संघाने एकही विकेट न गमावता ७०व धावा जोडल्या होत्या.

असं असतानाही भारतीय गोलंदाजांनी दमदार कमबॅक केलं आणि बांगलादेश संघावर ५१ धावांनी विजय मिळवला. भारतीय अ संघासाठी निशांत संधूने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत करत गाठली अंतिम फेरी..

उदयोन्मुख आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिला सामना पाकिस्तान अ आणि श्रीलंका अ या दोन्ही संघामध्ये पार पडला. या सामन्यात पाकिस्तान अ संघाने विजय मिळवत फायनलचं तिकीट मिळवलं आहे.

पाकिस्तान अ संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका अ संघाला केवळ २६२ धावा करता आल्या. (Latest sports updates)

emerging  asia cup 2023
IND vs WI 2nd Test: काय योगायोग म्हणावा हा! विराटच्या 29 व्या सेंच्युरीचं अन् क्रिकेटच्या देवाचं आहे खास कनेक्शन

भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ अंतिम सामन्याबाबत अधिक माहिती..

उदयोन्मुख आशिया चषक २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी म्हणजेच २३ जुलै रोजी पार पडणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरु होईल. भारतीय अ संघ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यात होणारा अंतिम सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स १ वर लाईव्ह पाहू शकता.

भारतीय अ संघाची आतापर्यंतची कामगिरी पाहता भारतीय अ संघाला या स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com