IND W vs SL W: 'Do or Die' लढतीत हरमनप्रीत अन् स्म्रितीची अर्धशतकं! श्रीलंकसमोर जिंकण्यासाठी मोठं आव्हान

India vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अतिशय महत्वाचा सामना सुरु आहे.
IND W vs SL W: 'Do or Die' लढतीत हरमनप्रीत अन् स्म्रितीची अर्धशतकं! श्रीलंकसमोर जिंकण्यासाठी मोठं आव्हान
ind vs sltwitter
Published On

India W vs Sri lanka W Live Score: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील १२ वा सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. सेमीफायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्वाचा आहे. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला ३ गडी बाद १७२ धावांपर्यंत मजल मारता आली आहे.

दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला. हा निर्णय भारतीय फलंदाजांनी योग्य ठरवला. भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या शेफाली वर्मा आणि स्म्रिती मंधानाने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

दोघींनी मिळून ९८ धावांची भागीदारी केली. शेफाली वर्मा ४० चेंडूत ४३ धावा करत माघारी परतली. तर स्म्रिती मंधानाने ३८ चेंडूत ५० धावा केल्या. स्म्रितीला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं. सुरुवात चांगली झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने शेवटही चांगला केला. शेवटी फलंदाजी करताना हरमनप्रीतने २७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली आहे.

IND W vs SL W: 'Do or Die' लढतीत हरमनप्रीत अन् स्म्रितीची अर्धशतकं! श्रीलंकसमोर जिंकण्यासाठी मोठं आव्हान
IND vs BAN: 'आम्ही नाही घाबरत, त्याच्यासारखे आमच्या नेट्समध्ये...' मयांक यादवबद्दल हे काय म्हणाला बांगलादेशचा कर्णधार

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत: शेफाली वर्मा, स्मृति मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), दिप्ती शर्मा, सजीवन सजना, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकुर सिंग.

श्रीलंका: विशमी गुणारत्ने, चामरी अट्टापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, नीलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (यष्टीरक्षक), अमा कंचना, सुगंधिका कुमारी, इनोका राणावीरा, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com