IND vs SL: भारत श्रीलंकेला व्हाईटवॅाश देणार? Playing 11 मध्ये मोठा बदल

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळल्या जाणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना 23 जुलै रोजी कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे.
IND vs SL
IND vs SLTwitter/ @OfficialSLC
Published On

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळल्या जाणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना 23 जुलै रोजी कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. हा केवळ या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना नाही तर 2021 सालचा भारताचा अखेरचा एकदिवसीय सामना शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ (Team India) खेळणार आहे. जरी भारताने ही मालिका 2-0 ने जिंकली असली तरी टी -20 मालिकेपूर्वी होणारा हा सामना ऑडिशनसारखा आहे.

पहिले दोन्ही सामने भारतीय संघाने आराामत जिंकले आणि मालिका आपल्या खिशात टाकली आहे. पहिल्या सामन्या कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या खेळीमुळे भारतीय संघ विजयी झाला होता. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात भारत सामना गमावतो का काय असं वाटत असताना दिपत चहार आणि भुवनेश्वर कुमार यांच्या जिगरबाज खेळीने भारताने दुसराही सामना जिंकला.

IND vs SL
पाकिस्तानला भारताचा 'ब' संघही हरवू शकतो; दानिश कनेरियाची भविष्यावाणी

आज तिसरा सामना जिंकून भारतीय संघ श्रीलंकेला व्हाईटवॅाश देतो का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भारताचा मुख्य संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेसाठी आहे. आजच्या सामन्यात संघ तोच राहणार का याबाबत अनेक चर्चा झाल्या होत्या. परंतू------------------करण्यात आला आहे. हा सामना भारतीय संघासाठी महत्तवाचा आहे कारण यानंतर भारताला ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.

भारताचा संघ

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), मनिष पांडे, हार्दिक पंड्या, नितेश राणा, के. गौतम, राहून चहर, नवदिप सैनी, चेतन सकारीया.

श्रीलंकेचा संघ

दासुन शनाका (कर्णधार), मिनोद भानुका, भानुका राजपक्षे, धनंजय डिसिलवा (उप-कर्णधार), चरित अस्लंका, वनिंदू हसरंगा, चमिका करुणरत्ने, इसरु उडाना, दुशमंता चमिरा, लक्षण संदाकन.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com