IND vs NZ: आश्विन हिट, कोहली सुपरहिट; दोघांनी रचले नवे रेकॉर्ड

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेची आज मुंबईत सांगता झाली.
IND vs NZ: आश्विन हिट, कोहली सुपरहिट; दोघांनी रचले नवे रेकॉर्ड
IND vs NZ: आश्विन हिट, कोहली सुपरहिट; दोघांनी रचले नवे रेकॉर्डTwitter/ @BCCI

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेची आज मुंबईत सांगता झाली. टीम इंडियाने (Team India) ही कसोटी ३७२ धावांनी जिंकून मालिका १-० ने जिंकली. या सामन्यात अनेक विक्रम झाले. यात सर्वात मोठा विक्रम भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर झाला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० सामने जिंकणारा कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे, मालिकेत अप्रतिम कामगिरी करणाऱ्या रविचंद्रन अश्विनने (Rravichandran Ashwin) अनिल कुंबळेला (Anil Khumble) एका विक्रमाच्या बाबतीत मागे टाकले आहे.

IND vs NZ: आश्विन हिट, कोहली सुपरहिट; दोघांनी रचले नवे रेकॉर्ड
क्रिकेट सुपरस्टार रोहित शर्मा आणि रिषभ पंतला अलिबागची भुरळ...

कोहलीने भारतासाठी ९७ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान भारताने ५० सामने जिंकले तर २८ सामने गमावले आणि १९ अनिर्णित राहिले. भारताने कोहलीच्या नेतृत्वाखाली २५४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. टीम इंडियाने यापैकी १५३ सामने जिंकले आहेत आणि ८८ गमावले आहेत. यादरम्यान ५ सामने टाय झाले आणि ८ सामन्यांचा निकाल लागला नाही. T २० बद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने ९५ सामन्यात ५९ सामने जिंकले आहेत. ३१ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. दोन सामने बरोबरीत सुटले तर तीन सामन्यांचा निकाल लागला नाही.

रविचंद्रन अश्विनने या कसोटीत विशेष कामगिरी केली आहे. अनिल कुंबळेनंतर घरच्या मैदानावर ३०० बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. कुंबळेने ३५० बळी घेतले आहेत. या यादीत अश्विन आता दुसऱ्या स्थानावर तर हरभजन सिंग (२६५ विकेट) तिसऱ्या स्थानावर आणि कपिल देव (२१९ विकेट) चौथ्या स्थानावर आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com