IND vs NZ: मयंकने भारताचा डाव राखला; पटेलने निम्मा संघ गारद केला

एका बाजूने अगरवाल खिंड लढवत आहे. तर एजाज पटेलने डावाला खिंडार पटले आहे.
IND vs NZ: मयंकने भारताचा डाव राखला;  पटेलने निम्मा संघ गारद केला
IND vs NZ: मयंकने भारताचा डाव राखला; पटेलने निम्मा संघ गारद केलाTwitter/@BCCI

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी (Second Test Match) सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या सामन्यात संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने 6 विकेट गमावल्या आहेत. मयंक अग्रवाल आणि अक्षर पटेल नाबाद आहेत. दुसऱ्या दिवशी वृद्धीमान साहा आणि रविचंद्रन अश्विन बाद झाले. दोघांनाही एजाजने पटेलने बाद केले. एजाजने आतापर्यंत भारताच्या डावातील सर्व 6 विकेट घेतल्या आहेत. एका बाजूने अगरवाल खिंड लढवत आहे. तर एजाज पटेलने डावाला खिंडार पटले आहे.

IND vs NZ: मयंकने भारताचा डाव राखला;  पटेलने निम्मा संघ गारद केला
Breaking: ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन

दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. पावसामुळे खराब ओल्या खेळपट्टीमुळे पहिल्या दिवसाचा खेळ उपाहारानंतर सुरू झाला. टीम इंडियाने पहिल्या दिवशी 70 षटकात 4 विकेट गमावत 221 धावा केल्या होत्या. भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल आणि न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेल हे पहिल्या दिवसाचे हिरो ठरले होते. मयंक १२० धावांवर नाबाद राहिला होता, तर एजाजने चारही विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. भारत अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असताना न्युझीलंडच्या गोलंदाजांनी आपला डाव राखला. तब्बल १०० च्या वर चेंडू खेळून सामना अनिर्णीत ठेवण्यात यश आले आहे. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारत ऑल आऊट होतो का? की आजचा दिवस खेळून काढतो हे दिवसा अखेर समजेल.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com